डॉ सुधाकर शास्त्री : देशाच्या अर्थ व्यवस्थेचे मारक
संजय ठक्कर युरो एक्सिम बँकेच्या CEO नी अर्थशास्त्राच्या दुश्मन कोण या विषयी विचार करायला लावणारे संशोधन जगा समोर ठेवले . .... देशाच्या अर्थ व्यवस्थेसाठी आपदा ठरणाऱ्या या लोकांबद्दल खरच विचार करावा लागेल .... कोण आहेत हि माणसं ?
१) सायकलीस्ट : जसे की डॉ सुधाकर शास्त्री
- त्यांनी कधी कार विकत घेतली नाही त्यामुळे कधी कार साथीचे कर्ज !
- त्यांनी कधी car insurance काढला नाही !
- कधी पेट्रोल डिझेलवर खर्च केला नाही !
- त्यांना कधी कार सर्व्हिसिंग लागली नाही का कार दुरुस्ती करावी लागली !!!!
- त्यांना कधी पार्किंग द्यावी लागली नाही
- सुधाकाकांचे कधी पोट सुटले नाही
- आणी हो , हे हि खरच आहे ! तंदुरुस्त लोकं देशाच्या अर्थ व्यवस्थे साठी घातक ठरतात !!देशाच्या अर्थ व्यवस्थे साठी तंदुरुस्त लोकं काय कामाचे !! ते कधी औषधी घेत नाहीत का हॉस्पिटलमध्ये जात नाहीत , डॉक्टरांच्या फीस देत नाहीत !!
- देशाच्या GDP मध्ये डॉ सुधाकर शास्त्रींचे काहीही कॉन्ट्रीबुशन नसते !!! विचारा यांच्या नातवांना ...
- या सुधाकर शास्त्रींनी किती लोकांचे जॉब गिळले बघा !!
याच्या उलट प्रत्येक नवीन मॅक डोनाल्ड आउटलेट मुले किमान 30 जॉबची निर्मिती होते - 10 कारडीओलॉजिस्ट (हृदयविकार तज्ञ) 10 डेंटिस्ट , 10 वेट लॉस एक्स्पर्टस . या व्यतिरिक्त मॅक डोनाल्ड चा स्टाफ
आता सांगा काय निवडण्यात हशील आहे
एक सायकलिस्ट सुधाकाका (अर्थव्यवस्थेचे मारक ) का मॅक डोनाल्ड !
तेव्हा तुम्ही देश भक्त असाल तर सुधाकर शास्त्रींनी वाचवलेले पैसे घ्या अन देशाची अर्थ व्यवस्था सुधरवा .... जा डोमिनोज, मॅक डोनाल्ड, अगदीच नाही तर कोल्हापुरी तडका किंवा गोली वडापाव !!
विचार करण्या जोगे आहे की नाही . 🤔🤔😀😀
(औरंगाबाद परभणी ट्रैन मधून निवांत लेखन )
No comments:
Post a Comment