पानं

Wednesday, December 7, 2022

देवेंद्र ... एक गझल भटांची !

 देवेंद्र ... एक गझल भटांची !


माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !


स्वतःसाठी, स्वतःच्या सुखासाठी नाही तर जगाला प्रकाश देण्यासाठी, अंधार दूर करण्यासाठी "माणसांच्या मध्यरात्री फिरणारा मी सूर्य !!”


नागपुरात जन्माला आलेली सुरेश भटांची गझल, त्यातल्या ओळी नागपुरातल्याच देवेंद्राने जणू सिद्ध करायचा विडा उचललेला !  


एक शांत, निश्चयी, ध्येयासक्त देवेंद्रजी महाराष्ट्राला लाभलेलं दैव म्हणावं ! जनमानसाप्रती अत्युच्च सेवाभाव, पक्षाप्रती निष्ठा, प्रसंगी त्याग भावना याचं जीतंजागतं प्रतीक म्हणजे देवेंद्र ! 


प्रचंड कष्ट करत मिळवलेले यश कुणी अलगद हिरावून घेते, अन् वर ठरवून निर्लज्जपणे खंजीर पाठीत खुपसला जातो तरी निश्चल, अविचल देवेंद्र भटांच्या ओळी सिद्धीस नेत असतो ..  


सारेच हे उमाळे आधीच योजलेले

सारेच हे जिव्हाळे आधीच बेतलेले !


सांभाळतात सारे आपापली दुकाने;

माझेच हे दिवाळे काढून लोक गेले !


अन् शेवटी मी सगळ्यांचा बदला घेणार आहे म्हणत ...मी सगळ्यांना माफ करून टाकले ...ही दिलदारी न भूतो न भविष्यती! !


देवेंद्रजी तुम्हाला सलाम !! संघाच्या कुशीत अन् मुशीत तयार झालेला स्वयंसेवक आम्ही तुमच्या कार्याला, गतीला, कार्यकुशलतेला प्रणाम देतो, सॅल्यूट देतो ... अखेर किती सोसशील...

अर्थात कविवर्य भटांनी पुढे चालत रहाण्यासाठी लिहिलेच की 


आता कुणाकुणाचे मी घाव आठवावे ?

येतात जे दिलासे तेही उगाळलेले !


केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर सर्व देशाचे व देशबांधवांचे लाडके देवेंद्रजी आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना उदंड निरामय आयुष्य लाभो. चिरायू वाढदिवसाच्या शुभकामना !


 - मंगलमूर्ती प्रभाकर शास्त्री

 उपाध्यक्ष  

 भाजपा 

छत्रपती संभाजीनगर

9422206749

बाबासाहेब @71

 सिन्सिअर शब्दाचा अर्थ मी नेटवर शोधला... प्रामाणिकपणा, समानार्थी शब्द : स्पष्टपणे ,कळकळ , अस्सलपणा, सद्भावना ,निष्पक्षता , विश्वसनीयता विश्वासार्हता , गांभीर्य ,सत्यता, मनापासून असे अनेक शब्द मिळाले ! 

      ऑक्सफर्ड डिक्शनरीत Heartfelt , Wholehearted , Profound , Deep असा एकदम सटीक अर्थ मला मिळाला .... 

     पण जेव्हा "अगस्ती डिक्शनरीत ' अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर मला *“भास्कर माधव alias बाबासाहेब कुलकर्णी इंदोर जबलपूर चेन्नईवाले'* असा अर्थ सापडला ! ! 

       सिन्सिअर शब्दाचे समानार्थी शब्द अक्षरशः जगलेले आमचे प्रिय काका बाबासाहेबांचा आज वाढदिवस ! 

       लहानपण आर्थिक विवंचनेत गेलेले . बारा तेराव्या वर्षी पितृ छत्र हरपलेल्या बाबासाहेबांना वडील बंधू श्यामकाकानी प्रेमळ बनवले म्हणायला हरकत नसावी . मी श्याम काकाना 1981साली अनुभवलेले . अत्यंत प्रेमळ स्वभाव तोच ह्यांच्यात झिरपलेला ! शरद काकांची शिस्त यांनी अंगात बानलेली .. अन् महत्वाचे म्हणजे सगळ्या मोठ्या भावांसाठी यांनी लक्ष्मणाची भूमिका पार पाडली. 

      तसे स्वच्छ्ता, टापटीप , जिथली वस्तू तिथे पोहोचविण्याच्या यांच्या उपद्व्यापमुळे सासरी यांची लोकप्रियता मार खाते . त्याची कसर ते सगळ्यांचे लाड पुरवत भरून काढतात. प्रत्येका साठी काहीं काही करायची यांना सवय आहे . त्यामुळे आम्ही खुश असतोच असतो . 

        काटकसर स्वतः च्याच बाबतीत कधी आढळते , बाकी इतरांवर खर्च करण्यात कुचराई नाही ! 

          मामीची (आईची ) दिर्घ काळ सेवा यांच्या भाग्यात होती त्यामुळे तिचे सर्वाधिक आशिष यांना लाभले . 

      इंजिनिअरिंग डिप्लोमा कंप्लिट केल्यावर बाबासाहेबांनी इलेक्ट्रिसिटी बोर्ड क्लार्क म्हणून करिअरची सुरुवात केली. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पर्यंत मजल मारली. लग्न झाल्यावर BE केले... यात त्यांचे काही योगदान नाही क्रेडिट गोज टु his better half ! सौ मावशीनी अभ्यासात काहीही अडथळे आणले नाहीत !!!! 

                वैभव मध्ये यांनी सगळे गुण ओतले . प्रसाद वर किंचित आईनी माया केली असावी ! लेकीन बाबा को नाराज नही करता वो ! दोघंही बाबासाहेबांची duplicate बनून वागतात . हे नसे थोडके . 

       सरतेशेवटी शिर साष्टांग नमस्कार घालत शुभकामना देतो .दीर्घ निरामय आयुष्याची अगस्ती मिनलची प्रार्थना रेणुके चरणी ! 

      प्रार्थयामहे भव शतायु:

      ईश्वर सदा त्वाम् च रक्षतु।

- अगस्ती .

Tuesday, December 6, 2022

बापू समजून घेताना

    बापूं विषयी काय वाटतं तुला

प्रश्नावर उत्तर आलं " आता खूप सौम्य झाले, मंजूच्या लग्नात त्यांच्यासमोर जायची हिंमत नव्हती ! तसं ते मला कधी रागावले नाही किंवा काही बोलले नाही. पण.. आपल्याला नेहमी प्रेमच दिलं त्यांनी ... घरी गेलं की टरबुज चिरून दे पेरू पपई खायला देत त्यांनी प्रेमाने खायला घातलं.... असं नाही रागावले कधी पण भीती वाटायची , आता कळत त्यांचा स्वभाव तापट आहे पण मनातून प्रेमळ आहेत ... फणसासारखे  '
           बापु समजून घेताना... मिनल नी छान सुरवात करून दिली . मागच्या पिढीतल एकमात्र " कला ' जोपासणारा कुणी असेल तर ते बापू ! त्यांनी काढलेले मधुबाला चे चित्र माझ्या संग्रही होते , आई सांगायची बापूंच्या चित्रकलेची महती !
  सगळे कलाकार वागण्यात बोलण्यात मनस्वी असतात . त्यांना व्यक्त व्हायला त्यांची कलाच असते . ती बापूंच्या बोटातून कधीच सटकली अन् महसूल खात्याच्या रुक्ष वातावरणात रमली . ..
     बापू कुणाला बेफिकीर , बिनधास्त ,  कुणाची भीडभाड न ठेवणारे वाटतीलही. मला हाच त्यांचा भाव आवडतो . पण खरंच ते तसे आहेत का ? बेफिकीर?
    तिकडे अमेरिकेत इयान चक्री वादळ धडकल्याच्या बातम्या आल्या तर पहिला फोन बापूंचा . "त्या पोराची काय हाल हवाल? सगळे ठीकठाक आहे ना ' विचारणार! भलाई मग प्रभ्याच तिकडचा पोऱ्या त्यांची विचारपूस करत असेल वा नसेल . ..
         वडीलबंधू मिलिंद फार चिडतो ... खुद की तरफ ध्यान नाही देते और और....   अनंताकडे मंजुकडे जास्त चित्त असतं त्यांचं ! ज्याच्याकडे जेव्हा आवश्यकता असते त्याच्याकडेच बापाचं लक्ष असतं बाबा ! ते बेफिकीर राहू शकत नाहीत .
          उगा नाटक त्यांना जमत नाही जे मनात ते ओठावर. मनात एक ओठावर दुसरे त्यांना जमत नाही  "भल्ला नाटकी आहे न तो' म्हणायला ते मागेपुढे पहात नाही  ! मी स्वतः बेफिकर बिनधास्त जगण्याच्या प्रयत्नात असतो पण जगू शकत नाही .
         त्यांच्या स्पष्टवक्तेपणा मुळे लवकर जवळ कुणी होत नाही .मात्र जवळ झालेले नंतर कधी दूरही होत नाहीत .
बापू किती वर्ष विचारता 88 झाले सांगतात . बापू पोट्ट्या सोट्ट्यायची आता फिकर सोडा .तुमचे पोट्टे आता साठीत पोहोचले . आपल्याला शंभरी टकाटक पुरी कराची आहे .
... दिर्घ निरामय आयुष्याच्या मनापासून शुभकामना .

अगस्ती
      
    
    
     














Thursday, October 27, 2022

ताईसाहेब साठीत



खरंच बाबीताई? 
नाही " बाबी ' फक्त 
आज साठीला टेकली ? 
आम्ही तिघेही लहान .
भाऊंची हि लाडली
कष्टाला कधी न चुकलेली ! 
कामचुकार तिच्या डिक्शनरीत विसरला गेलेला शब्द ! 
खरेतर ती आमची बाबी"ताई' मात्र आम्ही तिला ताई कधी जोडलेच नाही ... 
उद्धट अधिकार वापरत .. 
आज साठीत एंट्री! !! 

एक मैलाचा दगड पार करताहेत तुम्ही ताईसाहेब !
कवयत्री इंदिरा संतांच्या " गृह लक्ष्मी ' सिद्ध करताहात तुम्ही ....
एक दगड काळाचा ,
एक दगड कष्टाचा ,
एक दगड त्यागाचा .. कुटुंबासाठीच्या ! 
वात्सल्याचा थर घरासाठी वापरायचा .
अशी सुरेख चूल ...
घर सांभाळणारी ,
घर जोपासणारी ...
घर धनीण ?
अशी गृहघराने वेढलेली . जखडलेली गृहलक्ष्मी ! 
आणि मग कुकर , मग पोळ्या , फोडण्या 
थोरा पोरांच्या मन धरण्या ...
कितीतरी धागे घट्ट जखडून ठेवणारे 
सगळाच शिणवटा.
शिजवनाऱ्याही तुम्हीच ताईसाहेब 
शिजणाऱ्याही तुम्हीच ! ! 

एका अनामिक आनंदासाठी .

" चल नंतर बोलते आज घर भरणार आहे कुकर लावते आता ' वाढदिवस शुभेच्छा घेताना काटकसर वेळेची .. येणाऱ्या पाहुण्यांची दास्त राखल्या गेली पाहिजे !! 
 
एवढेच सांगतो तब्येत राखलीत तर हा आनंद राखाल ! तुमच्या इतर वाचन , नाटक ,संगीतातल्या आनंदासाठी , आरोग्यासाठी , दिर्घ आयुष्यासाठी गजानन चरणी मनधरणी बाकी काय ? 

अगस्ती 
27 नोव्हेंबर 2022

Friday, September 30, 2022

मायाळू" बाई ' रेणुका देवीदास शास्त्री

मायाळू शब्दाचा अर्थ शोधताय ? जा बबडू कडे ... बाईना भेट ! अर्थ अनुभवाल !!
          
          बबडी कडे जावं, बाईंच्या शेजारी बसावं , बाईंनी आपली वास्तुपुस्त करावी ... नमस्कार करायला खाली वाकल्यावर बाईंनी डोक्यावर हात फिरवावा ... अनगिनत कष्टांनी , बऱ्या वाईट अनुभवांनी समृध्द  सुरकुतलेल्या हातांचा तो मायेनं ममतेनं ओतप्रोत भरलेला स्पर्श म्हणजे ऐश्वर्य! आणि हे ऐश्वर्य / आनंद बाईंनी क्रित्येकाना मुक्त हस्ते वाटला .
      बाई अर्थात रेणुका देवीदासपंत शास्त्री , संजयरावांच्या मातोश्री आज देह ठेवत्या झाल्या . आपण बबडी कडे गेल्यावर अन् बाईंशी बोलल्यावर " फार दिवस इकडे फिरकला नाही , शुभांगी कशी आहे '  वगैरे झाल्यावर बबडाबाईला सूचना देऊन झाल्यावर , समोर आलेले सर्व काही खायची इच्छा नसतानाही खाऊन घ्या कारण त्यांच्या इच्छेला मान नव्हे तर त्यांच्या ममतेला सन्मान द्यावा ...  त्यातच त्यांचा आनंद !
     वेरूळला उपसलेले कष्ट , अगदी अलीकडचे , मी साक्षीदार आहे . त्या यजमनांच्या पंगती अन् त्यात आमच्या सारख्या पै पाहुण्यांच्या यातच त्यांनी आनंद घेतला . अपार कष्ट .
      बबडी संजयराव यांच्यासाठी पाठीशी खंबीर पणे उभी राहणारी माय आता असणार नाही . निर्व्याज प्रेम आता दुर्मिळ असेल . घरातली वडीलधारी मंडळी खाटेवर का असेना "ताकद " असते , ती ताकद नसणार ....
       अन् या पोकळी ला कुणी भरून काढू शकत नाही .या दुःखातून बाहेर येण्यासाठी संपूर्ण संजय शास्त्री परिवाराला ईश्वर शक्ती प्रदान करो .

अगस्ती .
      
         


Thursday, September 29, 2022

Satish Narkhede

 'अए अंजू " नंतर सर्वात जास्त कविवर्यानी उच्चारलेले काही शब्द असतील तर " अए सत्या किंवा अए सतीश !!! दोघांना अए अए करत सरांच्या खास टोनिंग मध्ये , (कस्तुरे मामी या टोनिंगची नक्कल अगदी अस्सल पेक्षा चांगली करतात म्हणे) ,  कामाला लावणारे सर या दोघांना किती मदत करत असतील देव जाणे ! पुन्हा वा व्वा करत झोडायला...अए तो भुरका आन की ग इकडं, वगैरे ...

     सकाळी सकाळी सत्याला घरी हरभऱ्यच्या झाडावर बहुदा चढवत दोघंही मधुघट मध्ये आले ... आपसूकच सत्या आंब्याच्या झाडावर अन् अरे जरा हिरवे कंच पानं काढ की रे ...म्हणत तोरणाची सोय झाली ! अन् सत्यकृपेने 

आंssबामाssय्य प्रसन्न झाली !! 

       सरांचा हा कॉलेजमेट आमच्या साठीही कसा जिगरी झाला कळलेच नाही . सतीश नारखेडे खरेच जिगरी झाले . दिवसात उगाच का होईना फोन तरी व्हायलाच पाहिजे .. राहणीमान एकदम टापोटाप !

     आम्हाला सतीश सर म्हणजे आधारस्तंभ ! घरी मलाच नाही तर शुभांगी ,मिनलला माझ्यापेक्षा आश्वासक नक्कीच . शुभुनी कंपनीतल्या पहिल्या पगारात या काकासाठी अख्खा पगार खर्चून मोबाइल घेतला होता अन् हा काका सुध्दा शुभूच्या वरातीला ओक्साबोक्शी रडला होता कदाचित माझ्यापेक्षा जास्त .... 

       असा लळा जिव्हाळा वाटणारे सतीश सर .तुमचा लोभ असाच अखंड उदंड मिळत राहो हि रेणुकेचराणी प्रार्थना ! 


अगस्ती 

सौ मिनल

पराग शास्त्री 2022

 पराग वयाने सर्वात लहान आणि प्रगल्भतेत सगळ्यात महान. 

सकाळपासून विचार करत होतो याच्यासाठी काय लिहू ? 

सगळेजण जमा झाले की याच्या जवळ माईक असतो. आणि या माईकचा सगळ्यांना हेवा वाटत असतो . सर्वजण ते गुमान एकत असतात , भले मग त्याची खेचत खेचत का होईना त्याला खिजवत का होईना ... गुमान ऐकतात आणि सर्वांना ऐकत रहावसं पण वाटतं ! खूप मोठा सेल्समन... त्याला जे विकायचं , विकूनच  बाहेर पडणार . समोरच्याला कळतच नाही आपण विकल्या गेलोय ! अर्थात कुठलीही बनवा बनवी नाही. मनाने स्वच्छ, निर्मळ अन् पापभिरू! आपले म्हणणे हसत हसत रुजवणार. 


आनंदी जगण्याचे मार्ग सांगणार आणि स्वतः जगणार ! कुरतडत जगण्याची त्याला सवयच नाही. हॉटेलमध्ये गेल्यावर बरेच जण बिल देण्याच्या वेळी हळूच बाहेर पाय काढतात, इकडे तिकडे पाहतात... मात्र परागचं वेगळच तो बिलं अंगावर घेतो !! 

आईची प्रचंड सेवा त्यानी केली मोठ्या आशीर्वादाची पुंजी त्यांनी जमा करून ठेवली. ... त्या आशीर्वादाच्या बळावर पुढच्या जीवनात त्याला आनंद मिळणारच आहे.. त्या आनंदासाठी , हसत खेळत उदंड जगण्यासाठी त्याला मनापासून शुभेच्छा 


अगस्ती

Saturday, January 22, 2022

दादामामा

 एका रस्ते अपघातात जायबंदी झालेला मामा , 

वास्तविक इतर सर्व मामांमध्ये आधुनिकतेला पटकन जवळ करणारा मामा , आता गाडी चालवू शकणार नव्हता अन  या वास्तवाला सामोरा झालेला मामा ... 

अन जीवनभर तो अपघात , ते शरीरात आलेले व्यंग याच कुठेही भांडवल न करता उत्साही जीवन जगलेला मामा ... 


तो अपघात अन त्यानंतर परत परत आलेले आघात पचवत पाऊणशे वयमान  गाठणारा मामा ....

    स्वछतेचा ध्यास घेत रोज किमान काही श्रमदान नित्यनेमाने पूर्ण करणारा मामा ...

      बायकोनी अन आप्तेष्टांनी कितीही बंधनं लादली तरी आपली खिलाडी वृत्ती न सोडणारा मामा ! 

      त्याच्यापेक्षा सगळ्या ज्युनियर बंधूंच्या शारीरिक व्याधींच्या सापेक्ष अनैसर्गिक अपघात आघात व्यतिरिक्त कुठल्याही व्याधींना जवळ येऊ न देणारा मामा ... 

       शुगर , बीपी , हृदय रोग या वयोमानपरत्वे मिळणाऱ्या भेटींना राहणीमानाने   नाकारणाऱ्या ...


"दंताजीचे ठाणे सुटले

नन्ना म्हणते मान

फुटले दोनही कान

अवघे पाऊणशे वयमान" 

 असे वर्णन ज्या वयाचे केले जाते त्या वयात प्रवेश मामाश्रींनी कधी केला कळेलच नाही ... 


...अन मामाचे असे वर्णन केले तर मार खाण्याशिवाय गत्यंतर नाही असा मामा ! 


     घरातील जेष्ठाने करावयाचे कर्तव्य क्वचितच चुकवले असतील असा जेष्ठत्व निभावलेला मामा ...


अन डॉ सुनील यांच्या भाषेत " बाप्पा तुझा लाडका मामा , प्रेमाचा मामा '' 


      बस असाच मामा मला जन्मोजन्मी लाभू देत अन या जन्मी माझ्या आयुष्याला पुरून उरू देत !  कोठेंश्वरा दादामामाला उदंड निरामय आयुष्य दे ! त्याच्या हातून तुझीच सेवा तर  घडणाराय ...


अगस्ती