पानं

Thursday, October 27, 2022

ताईसाहेब साठीत



खरंच बाबीताई? 
नाही " बाबी ' फक्त 
आज साठीला टेकली ? 
आम्ही तिघेही लहान .
भाऊंची हि लाडली
कष्टाला कधी न चुकलेली ! 
कामचुकार तिच्या डिक्शनरीत विसरला गेलेला शब्द ! 
खरेतर ती आमची बाबी"ताई' मात्र आम्ही तिला ताई कधी जोडलेच नाही ... 
उद्धट अधिकार वापरत .. 
आज साठीत एंट्री! !! 

एक मैलाचा दगड पार करताहेत तुम्ही ताईसाहेब !
कवयत्री इंदिरा संतांच्या " गृह लक्ष्मी ' सिद्ध करताहात तुम्ही ....
एक दगड काळाचा ,
एक दगड कष्टाचा ,
एक दगड त्यागाचा .. कुटुंबासाठीच्या ! 
वात्सल्याचा थर घरासाठी वापरायचा .
अशी सुरेख चूल ...
घर सांभाळणारी ,
घर जोपासणारी ...
घर धनीण ?
अशी गृहघराने वेढलेली . जखडलेली गृहलक्ष्मी ! 
आणि मग कुकर , मग पोळ्या , फोडण्या 
थोरा पोरांच्या मन धरण्या ...
कितीतरी धागे घट्ट जखडून ठेवणारे 
सगळाच शिणवटा.
शिजवनाऱ्याही तुम्हीच ताईसाहेब 
शिजणाऱ्याही तुम्हीच ! ! 

एका अनामिक आनंदासाठी .

" चल नंतर बोलते आज घर भरणार आहे कुकर लावते आता ' वाढदिवस शुभेच्छा घेताना काटकसर वेळेची .. येणाऱ्या पाहुण्यांची दास्त राखल्या गेली पाहिजे !! 
 
एवढेच सांगतो तब्येत राखलीत तर हा आनंद राखाल ! तुमच्या इतर वाचन , नाटक ,संगीतातल्या आनंदासाठी , आरोग्यासाठी , दिर्घ आयुष्यासाठी गजानन चरणी मनधरणी बाकी काय ? 

अगस्ती 
27 नोव्हेंबर 2022

No comments:

Post a Comment