मायाळू शब्दाचा अर्थ शोधताय ? जा बबडू कडे ... बाईना भेट ! अर्थ अनुभवाल !!
बबडी कडे जावं, बाईंच्या शेजारी बसावं , बाईंनी आपली वास्तुपुस्त करावी ... नमस्कार करायला खाली वाकल्यावर बाईंनी डोक्यावर हात फिरवावा ... अनगिनत कष्टांनी , बऱ्या वाईट अनुभवांनी समृध्द सुरकुतलेल्या हातांचा तो मायेनं ममतेनं ओतप्रोत भरलेला स्पर्श म्हणजे ऐश्वर्य! आणि हे ऐश्वर्य / आनंद बाईंनी क्रित्येकाना मुक्त हस्ते वाटला .
बाई अर्थात रेणुका देवीदासपंत शास्त्री , संजयरावांच्या मातोश्री आज देह ठेवत्या झाल्या . आपण बबडी कडे गेल्यावर अन् बाईंशी बोलल्यावर " फार दिवस इकडे फिरकला नाही , शुभांगी कशी आहे ' वगैरे झाल्यावर बबडाबाईला सूचना देऊन झाल्यावर , समोर आलेले सर्व काही खायची इच्छा नसतानाही खाऊन घ्या कारण त्यांच्या इच्छेला मान नव्हे तर त्यांच्या ममतेला सन्मान द्यावा ... त्यातच त्यांचा आनंद !
वेरूळला उपसलेले कष्ट , अगदी अलीकडचे , मी साक्षीदार आहे . त्या यजमनांच्या पंगती अन् त्यात आमच्या सारख्या पै पाहुण्यांच्या यातच त्यांनी आनंद घेतला . अपार कष्ट .
बबडी संजयराव यांच्यासाठी पाठीशी खंबीर पणे उभी राहणारी माय आता असणार नाही . निर्व्याज प्रेम आता दुर्मिळ असेल . घरातली वडीलधारी मंडळी खाटेवर का असेना "ताकद " असते , ती ताकद नसणार ....
अन् या पोकळी ला कुणी भरून काढू शकत नाही .या दुःखातून बाहेर येण्यासाठी संपूर्ण संजय शास्त्री परिवाराला ईश्वर शक्ती प्रदान करो .
अगस्ती .
Friday, September 30, 2022
मायाळू" बाई ' रेणुका देवीदास शास्त्री
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment