पराग वयाने सर्वात लहान आणि प्रगल्भतेत सगळ्यात महान.
सकाळपासून विचार करत होतो याच्यासाठी काय लिहू ?
सगळेजण जमा झाले की याच्या जवळ माईक असतो. आणि या माईकचा सगळ्यांना हेवा वाटत असतो . सर्वजण ते गुमान एकत असतात , भले मग त्याची खेचत खेचत का होईना त्याला खिजवत का होईना ... गुमान ऐकतात आणि सर्वांना ऐकत रहावसं पण वाटतं ! खूप मोठा सेल्समन... त्याला जे विकायचं , विकूनच बाहेर पडणार . समोरच्याला कळतच नाही आपण विकल्या गेलोय ! अर्थात कुठलीही बनवा बनवी नाही. मनाने स्वच्छ, निर्मळ अन् पापभिरू! आपले म्हणणे हसत हसत रुजवणार.
आनंदी जगण्याचे मार्ग सांगणार आणि स्वतः जगणार ! कुरतडत जगण्याची त्याला सवयच नाही. हॉटेलमध्ये गेल्यावर बरेच जण बिल देण्याच्या वेळी हळूच बाहेर पाय काढतात, इकडे तिकडे पाहतात... मात्र परागचं वेगळच तो बिलं अंगावर घेतो !!
आईची प्रचंड सेवा त्यानी केली मोठ्या आशीर्वादाची पुंजी त्यांनी जमा करून ठेवली. ... त्या आशीर्वादाच्या बळावर पुढच्या जीवनात त्याला आनंद मिळणारच आहे.. त्या आनंदासाठी , हसत खेळत उदंड जगण्यासाठी त्याला मनापासून शुभेच्छा
अगस्ती
No comments:
Post a Comment