पानं

Wednesday, December 7, 2022

बाबासाहेब @71

 सिन्सिअर शब्दाचा अर्थ मी नेटवर शोधला... प्रामाणिकपणा, समानार्थी शब्द : स्पष्टपणे ,कळकळ , अस्सलपणा, सद्भावना ,निष्पक्षता , विश्वसनीयता विश्वासार्हता , गांभीर्य ,सत्यता, मनापासून असे अनेक शब्द मिळाले ! 

      ऑक्सफर्ड डिक्शनरीत Heartfelt , Wholehearted , Profound , Deep असा एकदम सटीक अर्थ मला मिळाला .... 

     पण जेव्हा "अगस्ती डिक्शनरीत ' अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर मला *“भास्कर माधव alias बाबासाहेब कुलकर्णी इंदोर जबलपूर चेन्नईवाले'* असा अर्थ सापडला ! ! 

       सिन्सिअर शब्दाचे समानार्थी शब्द अक्षरशः जगलेले आमचे प्रिय काका बाबासाहेबांचा आज वाढदिवस ! 

       लहानपण आर्थिक विवंचनेत गेलेले . बारा तेराव्या वर्षी पितृ छत्र हरपलेल्या बाबासाहेबांना वडील बंधू श्यामकाकानी प्रेमळ बनवले म्हणायला हरकत नसावी . मी श्याम काकाना 1981साली अनुभवलेले . अत्यंत प्रेमळ स्वभाव तोच ह्यांच्यात झिरपलेला ! शरद काकांची शिस्त यांनी अंगात बानलेली .. अन् महत्वाचे म्हणजे सगळ्या मोठ्या भावांसाठी यांनी लक्ष्मणाची भूमिका पार पाडली. 

      तसे स्वच्छ्ता, टापटीप , जिथली वस्तू तिथे पोहोचविण्याच्या यांच्या उपद्व्यापमुळे सासरी यांची लोकप्रियता मार खाते . त्याची कसर ते सगळ्यांचे लाड पुरवत भरून काढतात. प्रत्येका साठी काहीं काही करायची यांना सवय आहे . त्यामुळे आम्ही खुश असतोच असतो . 

        काटकसर स्वतः च्याच बाबतीत कधी आढळते , बाकी इतरांवर खर्च करण्यात कुचराई नाही ! 

          मामीची (आईची ) दिर्घ काळ सेवा यांच्या भाग्यात होती त्यामुळे तिचे सर्वाधिक आशिष यांना लाभले . 

      इंजिनिअरिंग डिप्लोमा कंप्लिट केल्यावर बाबासाहेबांनी इलेक्ट्रिसिटी बोर्ड क्लार्क म्हणून करिअरची सुरुवात केली. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पर्यंत मजल मारली. लग्न झाल्यावर BE केले... यात त्यांचे काही योगदान नाही क्रेडिट गोज टु his better half ! सौ मावशीनी अभ्यासात काहीही अडथळे आणले नाहीत !!!! 

                वैभव मध्ये यांनी सगळे गुण ओतले . प्रसाद वर किंचित आईनी माया केली असावी ! लेकीन बाबा को नाराज नही करता वो ! दोघंही बाबासाहेबांची duplicate बनून वागतात . हे नसे थोडके . 

       सरतेशेवटी शिर साष्टांग नमस्कार घालत शुभकामना देतो .दीर्घ निरामय आयुष्याची अगस्ती मिनलची प्रार्थना रेणुके चरणी ! 

      प्रार्थयामहे भव शतायु:

      ईश्वर सदा त्वाम् च रक्षतु।

- अगस्ती .

No comments:

Post a Comment