पानं

Wednesday, December 7, 2022

देवेंद्र ... एक गझल भटांची !

 देवेंद्र ... एक गझल भटांची !


माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !


स्वतःसाठी, स्वतःच्या सुखासाठी नाही तर जगाला प्रकाश देण्यासाठी, अंधार दूर करण्यासाठी "माणसांच्या मध्यरात्री फिरणारा मी सूर्य !!”


नागपुरात जन्माला आलेली सुरेश भटांची गझल, त्यातल्या ओळी नागपुरातल्याच देवेंद्राने जणू सिद्ध करायचा विडा उचललेला !  


एक शांत, निश्चयी, ध्येयासक्त देवेंद्रजी महाराष्ट्राला लाभलेलं दैव म्हणावं ! जनमानसाप्रती अत्युच्च सेवाभाव, पक्षाप्रती निष्ठा, प्रसंगी त्याग भावना याचं जीतंजागतं प्रतीक म्हणजे देवेंद्र ! 


प्रचंड कष्ट करत मिळवलेले यश कुणी अलगद हिरावून घेते, अन् वर ठरवून निर्लज्जपणे खंजीर पाठीत खुपसला जातो तरी निश्चल, अविचल देवेंद्र भटांच्या ओळी सिद्धीस नेत असतो ..  


सारेच हे उमाळे आधीच योजलेले

सारेच हे जिव्हाळे आधीच बेतलेले !


सांभाळतात सारे आपापली दुकाने;

माझेच हे दिवाळे काढून लोक गेले !


अन् शेवटी मी सगळ्यांचा बदला घेणार आहे म्हणत ...मी सगळ्यांना माफ करून टाकले ...ही दिलदारी न भूतो न भविष्यती! !


देवेंद्रजी तुम्हाला सलाम !! संघाच्या कुशीत अन् मुशीत तयार झालेला स्वयंसेवक आम्ही तुमच्या कार्याला, गतीला, कार्यकुशलतेला प्रणाम देतो, सॅल्यूट देतो ... अखेर किती सोसशील...

अर्थात कविवर्य भटांनी पुढे चालत रहाण्यासाठी लिहिलेच की 


आता कुणाकुणाचे मी घाव आठवावे ?

येतात जे दिलासे तेही उगाळलेले !


केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर सर्व देशाचे व देशबांधवांचे लाडके देवेंद्रजी आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना उदंड निरामय आयुष्य लाभो. चिरायू वाढदिवसाच्या शुभकामना !


 - मंगलमूर्ती प्रभाकर शास्त्री

 उपाध्यक्ष  

 भाजपा 

छत्रपती संभाजीनगर

9422206749

No comments:

Post a Comment