विक्कीभाई नावानी मित्रांमध्ये अन् मित्रंमध्येच रमणारा आमचा मित्र विकास कुलकर्णी ग्रामीण भागात आपल्या वानेगावावर निरतीशय प्रेम करणारा ,ग्रामीण नाळ तुटू न देता शहरात वावरणारा ...अन् भाई गिरी तर आहेच सोबतीला !
ज्ञानु गणु जगू सोबत भानुदास पाटील अन् असे अनेक गावातले सवंगडी भेटले का या गड्याचं काम फत्ते! फोनवर एखादा गावाकडचा कॉल आला का ... हू हू हा हा ही हि करत अर्धातास निचंती समजायची ! ती सोसायटी , ती पंचायत अन् ती शाळा नंतर बाकी . गावावर नितांत प्रेम करणारा हा दोस्त इकडेही तितकाच सगळ्यांना हवा हवासा !ड्रामा डिपार्टमेंट नी याला चांगला घडवला . कलाकारी जिथे दाखवायची तिथे दाखवणार . भाईगिरी करायला एक तर हाती बंदूक लागते किंवा प्रेम वाटायची तयारी ! प्रेमानं हा आपली भाई गिरी खपवातो . ... सगळे गुमान याच एकतात . अगदी नेतेलोक सुध्दा ! !
घरात तर हा भाई राहणारच ! मोठ्या पासून छोट्या भावावर अन् घरी कुटुंबावर "भाई ' गिरी चालणारच ! सगळ्यांना घेऊन चालणे अन् जोडीला " माझं काय म्हणणं आहे ..मला काय म्हणायचं आहे '' करत ड्रामा डिपार्टमेंट कार्यरत करतो हा !
लेकरांवर... मुलींवर याची माया त्यांच्या माय पेक्षा उजवीच ! नसता बरीच मंडळी दोस्तमित्रांमध्ये रमली का कुटुंब विसरतात . मला विकास चे या बाबतीत कौतुक आहे . " जेवली का माय ? ' एवढी काळजी तो शंभर टक्के घेणारच घेणार . मी तरी अनुभवलय... अन् मुली तर लाघवी आहेतच ! रागीट बाबा अन् रागीट नवरा या भूमिका तो जगतोच आहे ! !
आज गणपती सहस्त्र आवर्तनं भाले सरकारच्या शेलगावात करतोय . बाप्पा याला उदंड निरामय आयुष्य देणारच आहे ... आमच्या शुभेच्छा "किरकिर रहित' आनंदी आयुष्यासाठी !!
विघ्नविनाशक गणेश तुम्हा वर देव सुखदम ... जीवेत शरदा शतम !
मंगलमूर्ती शास्त्री
No comments:
Post a Comment