जलाशयाचे सुटले पाणी
मुक्त , मोकळे ,अथांग आणि
उंदडे , उंडारे उगाच नाही
ऊर्जा ताकद उंची इतुकी
आकाशाला घाली गवसणी
बाप लेकीचं अलौकिक नातं आहे .मुलगी बापाला आईच्या मायेने जपत असते , बाप आपलं दुःख आईच्या हृदयासमान लेकीला सांगून मन हलकं करत असतो ...बापाचं लेकीवर जरा जास्तच प्रेम असत, कारण एका लेकीसाठीही एका बापालाही वैकुंठाहून परत यावं लागलं होतं !!!
" तुकोबा - भगिरथी ' नातं उलघडणारी वाक्य वाचली अन आज असलेल्या शुभुच्या वाढदिवसाच्या शुभचिंतनासाठीची नाळ सापडली ....
काय लिहावं शुभांगी साठी असा विचार डोक्यात अन वरील लेख !!
खरंच ज्याला लेक आहे तो बाप भाग्यवान ! मुलीचं प्रेम काय चीज आहे मी रोज अनुभवतो .... कालच सकाळी
एक तरी मुलगी असावी
जवळ येऊन बसावी
मनातली गुपितं
हळूच कानात सांगावी
एकतरी मुलगी असावी
साजिरी गोजिरी दिसावी
तिच्या मागण्या पुरवताना
माझी तारांबळ उडावी .....
Saturday, February 20, 2021
शुभुसाठी काय लिहावं
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment