लॉक डाऊन च्या काळात बापाला रुग्णालयात ऍडमिट
केलेलं ! गावात रस्त्यावरून पोलीस हलू देईनात , अन सकाळा चार वाजताच एक धाडसी बाई बापाच्या तब्यतीसाठी एकटी टॅक्सी मध्ये पोहचते ... बापाला बाळासारखं सांभाळणं !!
स्वतः सगळं मॅनेज करते तिला छोटी म्हणतात !
नावालाच छोटी !
नवऱ्याला कॅन्सर डिटेक्ट होतो , या दवाखान्यातून त्या दवाखान्यात , डॉक्टर , हॉस्पिटल , औषधी आणि तरीही नवऱ्याला बाळासारखं सांभाळणं !
स्वतः सगळं मॅनेज करते तिला छोटी म्हणतात !
नावालाच छोटी !
लॉक डाऊन आहे , मुलाला अभ्यासात ड्राय फ्रुटस ची बेगमी संपलेली ! पोरासाठीची मर मर ...गंगापूर हुन पार्सल पाठवायचे , घराबाहेर तर पडणे नाही ..बँकेच्या कर्मचाऱ्याला पकडून पार्सल पोचवण्याचा आटापिटा करणे , पोरांची मजबूत परवरीश करत
स्वतः सगळं मॅनेज करते तिला छोटी म्हणतात !
नावालाच छोटी !
लॉक डाऊन मध्ये टोल नाक्यावर पोलिसांनी गाडी अडवलेली ! मुलीला सासरी पाठवण्यासाठीचा आटापिटा चाललेला . ड्रायव्हर नी पटवापटवी करण्याचा प्रयत्न करत असताना त्या पोलिसाला त्याच्या कलीग कडून फोन येतो , अन तो गाडी सोडतो .... मैत्रिणीच्या पोलीस खात्यातील नातेवाईकाला ताबडतोब कामाला लावत....
स्वतः सगळं मॅनेज करते तिला छोटी म्हणतात !
नावालाच छोटी !
कर्तृत्वानं मोठी असलेल्या आमच्या या छोट्या बहिनाईला लक्ष लक्ष शुभाशीर्वाद अन शुभेच्छा !
- अगस्ती
Saturday, February 20, 2021
छोटी
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment