नाना !
एक हजार पौर्णिमेच्या कुळाचाराच
भाग्य ज्यानी मिळवलं असे नाना .
सहस्त्र चंद्र दर्शन योगी नाना ।
शास्त्रींच्या मागच्या पिढीतले शेंडेफळ नाना !
लाड तर अपेक्षितच , तरीही स्वतःला
जमिनीवर ठेवणारे नाना .
अर्न अँड लर्न
स्वतः चे शिक्षण स्वतः कमवून करणारे नाना .
मागच्या पिढीतला पहिला ग्रॅज्युएट !!
घरात सगळ्यात मोठया पासून लहानांनाही
दिशा देणारे नाना .
सगळ्यांना मार्गदर्शक म्हणून भूमिका निभावणारे नाना
असलेल्या तोकड्या पगारातही संसार सुखाचा
करणारे ते नानांच !
चांदीच्या लोटीचे कौतुक आयुष्यभर जपणारे नाना ।
तोकडा पगार म्हणून कुणाकडे हात पसरवण्या पासून
दूर राहणारे ते नानांच .
पगाराचे नियोजन असे की त्या तुटपुंज्या पगारात कैक लोकांना आर्थिक मदत निकडीच्या वेळी उभी करणारे सुद्धा
नानांच !
समाजात वावरताना सामाजिक कार्यात हिरिरीने समोर असणारे ते नानाच .
जेष्ठ नागरिकांच्या कष्टीक चेहऱ्यावर हसू आणणारे नानांच .
तर शाल जोडीतले मारत कनिष्ठांकडून काम
करवून घेणारेही नानाच !
आपल्या व्यायामात खंड कधी पडू न देणारे ते नाना !
अन एक्यांशीव्या वर्षी ऑपरेशन नन्तर , काठीच्या आधाराला नाकारणारे नानाच !
दत्तभक्ती एव्हढी की जयंतीनिमित्त चे पारायण त्याच जोमानं तब्येतीत पूर्ण करू जाणारे ते नानांच !
कर्तव्याबाबतीत हट्टी कुणी असेल तर नानांच !
शिस्तwबद्ध नाना , कर्तव्य कठोर नाना !
प्रेमळ नाना , मैत्र प्रिय नाना !
आपल्याला सहस्त्र चंद्र दर्शन शुभंकर होवो .
हास मिले या त्रास मिले
विश्वास मिले या फास मिले
किंतु कामना एक यही बस
प्रतिपल पग गतिमान चाहीये
मनसा सततं स्मरणीयम
वचसा सततं वंदनीयम
लोकहितं मम करणीयम
दुःख सागरे तरणीयम
कष्ट पर्वते चरणीयम
विपत्ती विपीने भ्रमनीयम
लोकहितम मम करनीयम
Saturday, February 20, 2021
नाना @81
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment