26मार्च 2018
आजच्या दिवसाचा समारोप एका नितांत सूंदर भावोत्कट केळवनाच्या कार्यक्रमाने झाली . मन भरून येणे ,कंठ दाटने, तेही एका हसत खेळत चाललेल्या कार्यक्रमात . डोळ्यात पाणी अनं बोलणे अवघड व्हावे असा .
आम्ही खरच नशीबावान आहोत .गजानन महाराजा च्या आशिर्वादाने इतके छान शेजारी मिळावेत . सोहोनी,नारखेड़े ,कस्तूरे, पोहनेरकर, गोसावी, कुलकर्णी, देशमुख, देसाई ,शास्त्री एक भलमोठं कुटुंबच !
आजच्या कार्यक्रमातील प्रत्येकाचा औपचारिकता विरहित सहभाग आनंद देणारा मात्र माझ्यासाठी आजच " घेवू कसा निरोप ,तूटतात आत धागे ' असा डोळे भरून आणणारा !
सरांची साखरपुडयाची कविता अनं आजची कविता सतत जाणीव देणाऱ्या ! ! खरच मुलीचा बाप हा छळभावनांचा पसारा असतो . आवरणे उत्तरोत्तर कठीण व्हावे ...
वासंती मामींचे कार्यक्रमास एक सूत्रात बांधने ,आणी कस्तूरमामानी मेनू सांभाळने आणी आम्ही एन्जॉय करणे हे नित्याचेच झाले . या वेळी मुलांच्या सहभागाने प्रोग्राम "खेळ' कर झाला .
हया अशा कार्यक्रमाचे पूर्वीचे महत्व कदाचित ,ज्यांच्याकडे शुभकार्ये आहेत त्यांना मदत वगैरे असावे ! मात्र आजच्या सापेक्ष महत्व तेव्हा अधोरेखित होते जेव्हा ..
आमची रंजुताई त्याचा आस्वाद घेते , व्यस्त शेड्यूल मध्ये वेळ काढत , डॉ रंजना देशमुख मैडम रुग्णालयात सकाळपासुन रात्री पर्यन्त असंख्यांचे शुगर बीपी हार्ट नार्मल करत , घरी सोवळेओवळे ,स्वयंपाक सांभाळत देशमुखांचे बीपी कंट्रोल करत (!!) ,सकाळी लवकर उठुन पक्वान्न म्हणुन करंज्या करते , मिनु तुला आवडतात " चल खा ' सुद्धा होते. गोविंद सरांशी किती एकरूप आहे ते पेपर मधल्या मार्कात पहिला नंबर घेत सिद्धही करते !
वर स्वागताच्या पायघड्या रंजुताईच्याच! सगळे ग्रेट !
सौ रसिका वहिनींची महालक्ष्मी आराधना वातावरण मंगलमय झालेले . सतीश काकांची फोटोग्राफी बहरुन आलेली !
चि शुभांगी च्या केळवनाला आपणा सर्वांच्या उत्साहाने रंगत आली . आपण सर्वांचे अनेक आभार

No comments:
Post a Comment