गुड्डी कुठे आहे तु ?
"अरे नानांकडुन येत आहे गजानन महाराज मंदिराजवळ रोपं पहात आहे तुझ्या घराजवळ '
"तर मग लवकर घरी ये , इथे तूझी गाड़ी पार्क कर , '
गुड्डी अनं मेघना यांची गाड़ी मधुघट समोर पार्क ... आमच्यासोबत बाहेरगावी निघाली गंगापुरला ! !
शुभु सिनेमाची तीन टिकीट जास्त बुक कर
"कुणाची ? अहो आता अर्धा तासच आहे पिक्चरला !! '
अग गुड्डी आत्याला निरोप दे, टिकिट बुक केली म्हणुन , 15 मिनिट अगोदर या म्हणाव DINSHAW icecream साठी ...
" गुड्डी ते राखीला रिटर्न गिफ्ट वगैरे पद्धत नसते , तुझा खूपच आग्रह असेल तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये त्या गरजु विद्यार्थ्यांच्या नावे चेक दे ...'
"अरे ह्यांनी आधीच दिले असेल नसता मी द्यायला लावते .... '
गुड्डी विद्यापीठ सिनेट साठी मला 50 पदवीधर मतदार दे बरं
" अरे आज मी बाहेर आहे उद्या संध्याकाळपर्यन्त चालेल ? ...'
दुसरया दिवशी 24 फॉर्म whatapp वर देणारी आमची सगळयात जवळची बहिण !
मैत्रीण मोना अकस्मात निवर्तली नक्कीच " निवांत' पणे !!! मुलाची काळजी घ्यायला गुड्डी आहे ना !! तिच्या प्रॉपर्टी डिपॉजिट्सची अज्ञान मुलाची आईपश्चात काळजी त्याची ही शेजारची मावशीच घेवू शकते न की मोनाचे रक्ताचे नातेवाईक !! हा भरवसा गुड्डीच देवू शकते !
माझ्या अनेक उचापती, ... रुग्णसेवा केंद्र असेल ,रुग्णालयातील अन्नप्रसाद केंद्र असेल, बालिकाश्रमाच्या मुलांसोबतची भाऊबीज , संघाच्या शिबिरासाठी तिळगुळाच्या पोळया जमा करने असो का सकाळीच एखादा कार्यक्रमास हजेरी लावणे असो विना तक्रार सहभाग नोंदवावा तो गुड्डीनीच . सगळी सेवाकार्य गुड्डीच्या माथी, स्टेजवर मिरवायला अगस्ती दादा आहेच ... निःस्पृह सेवा देणारी गुड्डी !!!
मागे आम्ही भावानी बहिनी वाटून घेतल्या होत्या राखी भाऊबीजेसाठी !
मी माझ्या कड़े तिघिंची जबाबदारी घेतली होती ... माई , बाबीताई , अनं गुड्डी . तिघिंच्या माहेरा कडुन दोन्ही सणांना साड़ी चोळी माझ्याकड़ून व्हावी हे अपेक्षित होते / आहे . स्व अण्णा आजोबानी आमच्या मामां कड़े हा शिरस्ता घालुन दिला त्यांचे अनुकरण आपणही करावे हि भावना मनात होती ... ... (आता या माहेरच्या वार्षिक साडीचे महत्व तितकेसे राहीले नाही आर्थिक सुदृढ़ते मुळे असेल कदाचित.. )
....... तर बाबिताई माई यांनी लहान भाऊ म्हणुन माझी काळजी घेणे बदल्यात मी साड़ी देणे (रिटर्न गिफ्ट ) समजू शकतो मग यात गुड्डी कशी आली असेल .... ?
प्रत्येक प्रश्नाला उत्तर असतेच असे नाही मात्र उत्तर शोधन्याचा प्रयत्न व्हायला हवा तो फटाफट गुड्डीच करू शकते अनं उत्तर मिळवतेहि !फ़ास्ट डिसीजन मेकर गुड्डीच . तिच्याजवळ "काकुबाई ' टाइप प्रश्न नसतात नन्तर पाहू ,बघते ,सांगते ,ह्यांना विचारावे लागेल ... अ ह ! ( आणी हो "ह्यांच्या ' विचाराबाहेर ही ती जात नाही )
तर अशा या अत्यंत गुणी , माहेरी तशी सासरी प्रियता मिळावलेली गुड्डी उर्फ सौ मानसी मकरंद देशपांडे हिचा वाढ दिवस 14 ऑगस्ट ला होता मी रेंज बाहेर हिंडत होतो त्यामुळे .... नवनवीन संकल्पासह येते वर्ष , आणी वर्षानुवर्ष, निरामय निखळ आनन्द दायीं राहो, सासर बरोबर माहेर (हया भावाला) जपणारे राहो हिच आई रेणुके चरणी प्रार्थना . -------------------- अगस्ती

No comments:
Post a Comment