पानं

Friday, March 19, 2010

वानवा आयांचाच !

आई..........
एक आर्त किंकाळी .....
"वैरीणीलाच आई म्हणू का ?"
भ्रूण सरणावर चढत होते !
गर्भजकाच्या भेसूर विज्ञानाने
तिचा खुन केला होता,
...............तिच्या मातेनेच!!
भृण्खुनाचे पातक मस्तकी घेऊन
जगण्याचा निर्धार केला होता
................तिच्या मातेनेच!!
लिंगभेदाचे गुढ रहस्य
खुनी केले होते ................
. .............तिच्या मातेनेच !!
जन्मापूर्वीच तिला सरणावर चढवले होते
..............तिच्या मातेनेच !!
"अगं आई मुलगा असती तर नाव
तुझं का चालणार होतं? " भ्रुण म्हणालं,
"अन त्या नवऱ्याच्या नावासाठी भ्रुण हत्येच पाप
तू मात्र आपल्या खांद्यावर मिरवणार !!
'माता न तु वैरिणी ' बनू नकोस !
गर्भजलाने लिंगभेद करू नकोस !
आई हे ईश्वरी स्वरूप आहे ....
राक्षशी वैरीण तू बनू नकोस !
नाहीतर
उद्या 'आई' चाच वानवा असेल !!!

No comments:

Post a Comment