मंजु. .. लहानपणापासून निर्व्याज प्रेम वाटणारी ! कुणालाही न दुखावणारी, अत्यंत सहनशील “बापु शास्त्री‘ कुटुंबातील दुर्मिळ गुण ( मिलिंददादाजी मारायला धावू नका 😜, इतके गरम होऊ नका 😃! सुरेखा वहिनी अपवाद !! अन आता आमची लाडकी सुनबाई !!!! ) बाबीताई म्हणते ‘ बापु “ काढ संपुर्ण शास्त्री कुटुंबातील लिही. जय हो शास्त्री परिवार ... जयश्री वहिनी पासून स्वरूपापर्यंत सगळ्या भावजया बाबीताई वर खुश. .... तर मंजु म्हणजे मला आठवते आठवणीने सगळ्यांचे हॅपी बड्डे लक्षात ठेऊन पत्र वा ग्रीटिंग्स पाठवून लक्ष लक्ष शुभेच्छा वाटणारी अशी.!! सगळ्यांना माफ करणारी खरंच. जाऊ दे रे दादा असं कितीक वेळा तिनं समजावलं असणार. अन असेच समजत, समजावत दुःखातही सुख शोधणारी !
आम्ही भाऊ लोकं तिच्या क्रित्येक भाऊबीजा राख्या घरी बसून साजऱ्या केल्या असतील मात्र एखादं दुसऱ्या भाऊबीजेला जावं अन आयुष्याचं आम्ही पुण्य कमवावं इतकं दुर्लभ स्वागत तिच्याकडून मिळवावं !! खरेतर सगळ्या बहिणीं मध्ये आम्ही सर्वात अधिक तिचे देणं लागतो इतकं स्वतःच कुटुंब सांभाळीत माहेर सासर तीनं जपलंय.
मंजु तुलाही दीर्घ निरामय आयुष्यासाठी लक्ष लक्ष शुभेच्छा !
स्वस्थ रहा मस्त रहा
अगस्ती

No comments:
Post a Comment