"सर आज चहा पिल्याशिवाय जायचे नाही '
मी चहाला घाबरून आणखीनच वेगानं पळ काढला महालक्ष्मी चौकातून .
" सर चहा' म्हणत सचिन नी हात घट्ट पकडला खरा मी सोडवत निघालो गाडीकडे !
" सर आज माझा वाढदिवस आहे !' मला खरे वाटले नाही
" मला चहावर कटवतो का ? संध्याकाळी वाढदिवसाच सेलेब्रेशन सचिनला कापल्या शिवाय करणार नाही , कुठल्या हॉटेलला टेबल बुक करतो सांग ' म्हणत मी पसार झालो .आज एकच ध्यास होता मतदार नोंदणीचा !
रात्री नवाला फेसबुक उघडले तो सचिनवर शुभेच्छांचा वर्षाव होता ! मला सचिनचा गुन्हेगार झाल्यासारखे वाटले . फेसबुक वर किती अवलंबून असतो आपण ..
शुभेच्छा दिल्या " आता सचिनला बाहेर जाऊ माझ्या खर्चाने म्हटले ' . त्याने सौ सोबत प्लॅनिंग सांगितले ...
सचिन करोडे .. एक स्वयंसेवक , हुरहुन्नरी वॉर्ड अध्यक्ष ! त्याच्या तोंडी नाही हा शब्द नाही . सचिन कुठल्याही वर्गात सहज वावरणारा , पटकन जिवाभावाचा कसा होतो कुणाचाही कळत नाही ! मैत्र जपणे त्याला छान जमते .
एक कलासक्त माणूस , कलाकार . सामाजिक कार्याची तळमळ असलेला ! " जाणिवा ' जपणारा ! स्वस्त धान्य दुकानदार कसे असावे तर सचिन सारखे .
शासकीय अन्न सुरक्षा समाजाच्या शेवटच्या वर्गापर्यंत पोहोचव सचीन खूप शुभेच्छा मिळवशील . खूप मोठा हो , खूप यश मिळव . सगळ्यांना मित्र बनव .
" फूल होंगे शूल सारे,
मित्र होंगे सब विरोधक ' आदर्श स्थिती आण !
हेच मागणं मातृभूच्या वेदना कमी करण्यासाठी !
आईची तर तू चॅन सेवा करतोस ! तिला काही कमी पडता कामा नाही याची काळजी घे !
अनगीनत शुभेच्छांसह -मंगलमुर्ती शास्त्री
No comments:
Post a Comment