पानं

Wednesday, December 7, 2022

देवेंद्र ... एक गझल भटांची !

 देवेंद्र ... एक गझल भटांची !


माणसांच्या मध्यरात्री हिंडणारा सूर्य मी

माझियासाठी न माझा पेटण्याचा सोहळा !


स्वतःसाठी, स्वतःच्या सुखासाठी नाही तर जगाला प्रकाश देण्यासाठी, अंधार दूर करण्यासाठी "माणसांच्या मध्यरात्री फिरणारा मी सूर्य !!”


नागपुरात जन्माला आलेली सुरेश भटांची गझल, त्यातल्या ओळी नागपुरातल्याच देवेंद्राने जणू सिद्ध करायचा विडा उचललेला !  


एक शांत, निश्चयी, ध्येयासक्त देवेंद्रजी महाराष्ट्राला लाभलेलं दैव म्हणावं ! जनमानसाप्रती अत्युच्च सेवाभाव, पक्षाप्रती निष्ठा, प्रसंगी त्याग भावना याचं जीतंजागतं प्रतीक म्हणजे देवेंद्र ! 


प्रचंड कष्ट करत मिळवलेले यश कुणी अलगद हिरावून घेते, अन् वर ठरवून निर्लज्जपणे खंजीर पाठीत खुपसला जातो तरी निश्चल, अविचल देवेंद्र भटांच्या ओळी सिद्धीस नेत असतो ..  


सारेच हे उमाळे आधीच योजलेले

सारेच हे जिव्हाळे आधीच बेतलेले !


सांभाळतात सारे आपापली दुकाने;

माझेच हे दिवाळे काढून लोक गेले !


अन् शेवटी मी सगळ्यांचा बदला घेणार आहे म्हणत ...मी सगळ्यांना माफ करून टाकले ...ही दिलदारी न भूतो न भविष्यती! !


देवेंद्रजी तुम्हाला सलाम !! संघाच्या कुशीत अन् मुशीत तयार झालेला स्वयंसेवक आम्ही तुमच्या कार्याला, गतीला, कार्यकुशलतेला प्रणाम देतो, सॅल्यूट देतो ... अखेर किती सोसशील...

अर्थात कविवर्य भटांनी पुढे चालत रहाण्यासाठी लिहिलेच की 


आता कुणाकुणाचे मी घाव आठवावे ?

येतात जे दिलासे तेही उगाळलेले !


केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर सर्व देशाचे व देशबांधवांचे लाडके देवेंद्रजी आपला वाढदिवस साजरा करत आहेत. त्यांना उदंड निरामय आयुष्य लाभो. चिरायू वाढदिवसाच्या शुभकामना !


 - मंगलमूर्ती प्रभाकर शास्त्री

 उपाध्यक्ष  

 भाजपा 

छत्रपती संभाजीनगर

9422206749

बाबासाहेब @71

 सिन्सिअर शब्दाचा अर्थ मी नेटवर शोधला... प्रामाणिकपणा, समानार्थी शब्द : स्पष्टपणे ,कळकळ , अस्सलपणा, सद्भावना ,निष्पक्षता , विश्वसनीयता विश्वासार्हता , गांभीर्य ,सत्यता, मनापासून असे अनेक शब्द मिळाले ! 

      ऑक्सफर्ड डिक्शनरीत Heartfelt , Wholehearted , Profound , Deep असा एकदम सटीक अर्थ मला मिळाला .... 

     पण जेव्हा "अगस्ती डिक्शनरीत ' अर्थ शोधण्याचा प्रयत्न केला तर मला *“भास्कर माधव alias बाबासाहेब कुलकर्णी इंदोर जबलपूर चेन्नईवाले'* असा अर्थ सापडला ! ! 

       सिन्सिअर शब्दाचे समानार्थी शब्द अक्षरशः जगलेले आमचे प्रिय काका बाबासाहेबांचा आज वाढदिवस ! 

       लहानपण आर्थिक विवंचनेत गेलेले . बारा तेराव्या वर्षी पितृ छत्र हरपलेल्या बाबासाहेबांना वडील बंधू श्यामकाकानी प्रेमळ बनवले म्हणायला हरकत नसावी . मी श्याम काकाना 1981साली अनुभवलेले . अत्यंत प्रेमळ स्वभाव तोच ह्यांच्यात झिरपलेला ! शरद काकांची शिस्त यांनी अंगात बानलेली .. अन् महत्वाचे म्हणजे सगळ्या मोठ्या भावांसाठी यांनी लक्ष्मणाची भूमिका पार पाडली. 

      तसे स्वच्छ्ता, टापटीप , जिथली वस्तू तिथे पोहोचविण्याच्या यांच्या उपद्व्यापमुळे सासरी यांची लोकप्रियता मार खाते . त्याची कसर ते सगळ्यांचे लाड पुरवत भरून काढतात. प्रत्येका साठी काहीं काही करायची यांना सवय आहे . त्यामुळे आम्ही खुश असतोच असतो . 

        काटकसर स्वतः च्याच बाबतीत कधी आढळते , बाकी इतरांवर खर्च करण्यात कुचराई नाही ! 

          मामीची (आईची ) दिर्घ काळ सेवा यांच्या भाग्यात होती त्यामुळे तिचे सर्वाधिक आशिष यांना लाभले . 

      इंजिनिअरिंग डिप्लोमा कंप्लिट केल्यावर बाबासाहेबांनी इलेक्ट्रिसिटी बोर्ड क्लार्क म्हणून करिअरची सुरुवात केली. एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर पर्यंत मजल मारली. लग्न झाल्यावर BE केले... यात त्यांचे काही योगदान नाही क्रेडिट गोज टु his better half ! सौ मावशीनी अभ्यासात काहीही अडथळे आणले नाहीत !!!! 

                वैभव मध्ये यांनी सगळे गुण ओतले . प्रसाद वर किंचित आईनी माया केली असावी ! लेकीन बाबा को नाराज नही करता वो ! दोघंही बाबासाहेबांची duplicate बनून वागतात . हे नसे थोडके . 

       सरतेशेवटी शिर साष्टांग नमस्कार घालत शुभकामना देतो .दीर्घ निरामय आयुष्याची अगस्ती मिनलची प्रार्थना रेणुके चरणी ! 

      प्रार्थयामहे भव शतायु:

      ईश्वर सदा त्वाम् च रक्षतु।

- अगस्ती .

Tuesday, December 6, 2022

बापू समजून घेताना

    बापूं विषयी काय वाटतं तुला

प्रश्नावर उत्तर आलं " आता खूप सौम्य झाले, मंजूच्या लग्नात त्यांच्यासमोर जायची हिंमत नव्हती ! तसं ते मला कधी रागावले नाही किंवा काही बोलले नाही. पण.. आपल्याला नेहमी प्रेमच दिलं त्यांनी ... घरी गेलं की टरबुज चिरून दे पेरू पपई खायला देत त्यांनी प्रेमाने खायला घातलं.... असं नाही रागावले कधी पण भीती वाटायची , आता कळत त्यांचा स्वभाव तापट आहे पण मनातून प्रेमळ आहेत ... फणसासारखे  '
           बापु समजून घेताना... मिनल नी छान सुरवात करून दिली . मागच्या पिढीतल एकमात्र " कला ' जोपासणारा कुणी असेल तर ते बापू ! त्यांनी काढलेले मधुबाला चे चित्र माझ्या संग्रही होते , आई सांगायची बापूंच्या चित्रकलेची महती !
  सगळे कलाकार वागण्यात बोलण्यात मनस्वी असतात . त्यांना व्यक्त व्हायला त्यांची कलाच असते . ती बापूंच्या बोटातून कधीच सटकली अन् महसूल खात्याच्या रुक्ष वातावरणात रमली . ..
     बापू कुणाला बेफिकीर , बिनधास्त ,  कुणाची भीडभाड न ठेवणारे वाटतीलही. मला हाच त्यांचा भाव आवडतो . पण खरंच ते तसे आहेत का ? बेफिकीर?
    तिकडे अमेरिकेत इयान चक्री वादळ धडकल्याच्या बातम्या आल्या तर पहिला फोन बापूंचा . "त्या पोराची काय हाल हवाल? सगळे ठीकठाक आहे ना ' विचारणार! भलाई मग प्रभ्याच तिकडचा पोऱ्या त्यांची विचारपूस करत असेल वा नसेल . ..
         वडीलबंधू मिलिंद फार चिडतो ... खुद की तरफ ध्यान नाही देते और और....   अनंताकडे मंजुकडे जास्त चित्त असतं त्यांचं ! ज्याच्याकडे जेव्हा आवश्यकता असते त्याच्याकडेच बापाचं लक्ष असतं बाबा ! ते बेफिकीर राहू शकत नाहीत .
          उगा नाटक त्यांना जमत नाही जे मनात ते ओठावर. मनात एक ओठावर दुसरे त्यांना जमत नाही  "भल्ला नाटकी आहे न तो' म्हणायला ते मागेपुढे पहात नाही  ! मी स्वतः बेफिकर बिनधास्त जगण्याच्या प्रयत्नात असतो पण जगू शकत नाही .
         त्यांच्या स्पष्टवक्तेपणा मुळे लवकर जवळ कुणी होत नाही .मात्र जवळ झालेले नंतर कधी दूरही होत नाहीत .
बापू किती वर्ष विचारता 88 झाले सांगतात . बापू पोट्ट्या सोट्ट्यायची आता फिकर सोडा .तुमचे पोट्टे आता साठीत पोहोचले . आपल्याला शंभरी टकाटक पुरी कराची आहे .
... दिर्घ निरामय आयुष्याच्या मनापासून शुभकामना .

अगस्ती