" खडकाळ प्रांत तो
ही जेथून निघालीपथ शोधीत आली
रानातून अकेली ... '
काल छोटीच अभिनंदन करतांना कुसुमाग्रजांचे शब्द आठवले ! नाना निघतांना म्हणाले "सगळे भाऊ तुझ्या पाठीशी आहेत काळजी करू नको ' .. अन मी नेहमी छोटीला सांगतो "तुझे तुलाच निपटायचे आहे , डोळ्यात पाणी काढत बसू नको ...' असे उपचार !!
काल छोटीला प्रमोशन मिळाले ती मोठ्ठी झाली अतिशय आनंद झाला .नानांचा फोन गदगदलेल्या स्वरात सांगत होता छोटी सुपरवायजर झाली ... अन सर्व आठव डोळ्यासमोर नानांनी उभे केले ! नानांनी केलेली मेहनत ती .कामात आली . .. त्यांच्या मेहनतीला छोटीनी न्याय दिला पदोन्नती मिळवून ! संस्थाचालकांनी तिला निवडले दोघींमधून ... संस्था चालक हे उद्योगपती आहेत संपूर्णतः प्रोफेशनल ! उगाच भावनेत ते निर्णय नक्कीच घेणारे नाहीत .
तिची दोन/अडीच हजार रुपयांच्या पगारावर काही वर्षे केलेल्या नोकरी पासुनचा मी साक्षीदार आहे ! स्वाभिमानी छोटी कुणापुढे हात पसरवणारी ... अशक्य ! तेवढ्याच रकमेत नानांच्या साथीने तिनं घर हाकललं u. नानांच्या जिल्हा परिषदेच्या चकरा ... ते सीटर रिक्षांन फिरणं ती नानांची पायपीट औरंगाबादेत , अन तिकडे छोटीनी शाळेत अपार मेहनत घेत , अंगावर स्वतःहून अन्यन्य जबाबदाऱ्या घेत , शाळेचा अविभाज्य घटक स्वतःला बनवत ... दिलेलं काम कुणीही करतच मात्र दोन तीन हजारात काम करणाऱ्या छोटीचं शाळेतील योगदान संस्थाचालकांसाठी अनिवार्य अन महत्वाचं झाले होते ! त्यांनीही साथ दिली , नानांचे प्रयत्न कामाला आले अन आता त्याची फलश्रुती मिळाली .
आणि हे सगळं तिनी एकटीनं केले हे मी म्हणतोय , मग नानांची साथ ? ... मग मी म्हणतो ज्याचे त्यालाच निपटायचे असते . बाकीचे सगळे केमिस्ट्रीतल्या कॅटॅलिस्टच्या भूमिकेत असतात अगदी नानांची भूमिकाg🗺️
सुद्धा !
एकटीन रस्ता शोधायचा असतो ! पूर्वी खूप चिडचिड करायची , आता हसत खेळत ,डोळ्यात पाणी न काढता ... खंबीर छोटी ! वास्तविक छोटी अन पल्ली मुत्र्या डोळ्याच्या म्हणून फेमस होत्या . दोघींनी स्वतःला सबळ केले . स्वबळावर उभं राहून सक्षम केलं त्यांनी स्वतः ला . ..
" भाऊ तुझ्या पाठीशी ...' सांगताना नानांना इतकेच सांगतो तुम्ही लेकींना अस घडवलंय का त्याच भावांच्या पाठी उभ्या असतात . जशी गुडडी माझ्या पाठीशी !!
छोटी नी आज आनंद दिला .शाळेत सौ विदुला पदे मॅडम "सुप्पर ' वाईज नक्कीच करतील यात शंका नाही. तिच्या नव्या जबाबदारीला शुभेच्छा मनःपूर्वक .
अगस्ती
सौ मिनल
=
^
No comments:
Post a Comment