खूप छान चर्चा !
जी गोष्ट माझ्या हातात नाही त्या गोष्टीबद्दल काळजी न करण्याची वृत्ती कशी विकसित करता येईल .
जे व्हायचे असेल ते होईल , जो होगा सो होगा !
"बेफिकीर वृत्ती ' डेव्हलप कशी करता येईल .
काल देवेंद्र सोबत चर्चा झाली तो म्हणाला मी गेल्या सहा आठ महिन्यात असं स्वतःला विकसित केलंय की ताण घ्यायचा नाही . फिकीर करायची नाही . काम करत राहायचे फलश्रुती काय असेल त्याकडे दुर्लक्ष करायचे .फळ आंनद दायी असेल तर वेल अँड गुड , नाही तर अपेक्षाच नाही .. कर्मण्ये ... वगैरे आपण लहानपणापासून शिकलो मात्र "फलेशु कदाचन 'ला आमची गाडी ब्रेक डाउन होते ...
खरच शक्य आहे हे ? बोलणे सोपे आहे ...
आज गुरू ठाकूर यांनी लिहिलेलं काळजी गीत वाचण्यात आलं ....सुंदर गीत
*होणार होतला जाणार जातला*
*मागे तू फिरू नको*
*उगाच सांडून खऱ्याची संगत*
*खोट्याची धरू नको*
*येईल दिवस तुझा हि माणसा*
*जिगर सोडू नको*
*तुझ्या हाती आहे डाव सारा*
*इसर गजाल कालची रे*
*देवाक काळजी रे*
*माझ्या देवाक काळजी रे*
*गुरू ठाकूर* खरच नावाप्रमाणेच शब्द गुरू आहेत . माझे अति आवडते गीतकार !
देवेन्द्र शी चर्चा करतांना मजा येते , त्याचं वाचन खूप आहे , आणि मग विषय मिळतात लिहायला . परवा रात्री बोलताना तो म्हणाला , आमचं एकमत झालं, कि जी गोष्ट माझ्या हातात नाही त्याचा स्ट्रेस का घ्यायचा !
अन आज रात्री देवाला काळजी आहे रे सांगणारे गुरू ठाकूर भेटले .... यावर चर्चा व्हायला पाहिजे ग्रुपवर .
इतके सगळे लिहिले अन आता पाच वाजले सकाळचे म्हणून गप डोळे मिटून पडू म्हणून शुभुनी रात्री टाकलेला मेसेज वाचायला व्हाट्सअप्प उघडले तर ...
Gharcoool ग्रुपवर " काळजी ' करणाऱ्या माणसाचा हॅपी बर्थ डे ! सगळ्यांचीच काळजी असणारे किंबहुना करणारया आमच्या बाबासाहेबांना आज वाढदिवस निमित्ताने शीर साष्टांग नमस्कार .....ते आशीर्वाद देतानाही म्हणतील " काळजी घे रे बाबा ! '
जबलपूर ला सगळी मंडळी जमलेली, मस्त रमी चा डाव मांडलेला ! सगळे डब्बा खेळण्यात मग्न ! बाबासाहेब सुद्धा *डब्ब्या* च्याच काळजीत !! टेन्शन मध्ये आपटेकाकू कडून आणायच्या डब्ब्याच्या काळजी त . मला आठवते कुणी तरी ऐन वेळी मेम्बर वाढलेले ( बहुदा राजुदादा फडके) अन बाबासाहेबाना टेन्शन डबा पुरेल का नाही !
त्यांना काळजी साठी कुठलेही कारण पुरेसे आहे . अर्थात त्यामुळे आम्ही मजेत राहतो हे हि तितकेच खरे ...पण बाबासाहेब काळ सोकावतो हो . आम्ही तुमची पोरं कुणाची कशाची काळजी करायचा विचारही डोक्यात येऊ देत नाही मग !!!!
व्यवसायाने निवृत्त अभियंता , अत्यंत शिस्तबद्ध जीवन , नीटनेटके पणात त्यांचा कुणी हात धरू शकणार नाही असे ,इतरांची काळजी वाहणारे ...
असे आमचे काका बाबासाहेब उर्फ *भास्कर माधव कुलकर्णी* जबलपूर याना दीर्घ निरामय आयुष्यासाठी शुभ कामना ! !
चर्चा काळजी या विषयावर झाली पाहिजे ! प्रत्यक्षात उतरवणे कठीण आहे . इतकी चर्चा तासभर करून देवेन्द्रला मी कोरोना बाधित झाल्याचे ऐकून दर तासाला अगस्ती डोळ्यासमोर येतोय अन त्याचे जागरण ! हेरंब रामरक्षा म्हणतोय ..... त्याबाबतीत मी बाबीताई बिनधास्त आहोत .
अस्मादिकाना बंधुराजांचेच टेन्शन !
आणि आजची उत्सव मूर्ती बाबासाहेब उर्फ काळजीकाकांना अगस्ती मिनू तर्फे *काळज्या* सप्रेम भेट .बाकी देण्यासारखे काय . एन्जॉय .
चर्चा मात्र झालीच पाहिजे !
No comments:
Post a Comment