प्रा विजय पोहणेरकर
नंदिग्राम कॉलनी चेच नाही तर औरंगाबादचे भूषण !!
सरांच्या कविता , सरांची केमिस्ट्री , बॉडी लँग्वेज ,
सगळंच अफलातून !
हा मनुष्य रसायनातला , अणू रेणू चा असा सदस्य आहे की जो सगळ्यांशी मैत्री करतो किंवा त्यांच्या केमिस्ट्री च्या भाषेत freind नावाचा मॉलेक्युल तयार व्हायला one of the atom has to be Vijay Pohnerkar ! सर भेटले अन दोस्ती झाली नाही असे होणे नाही !!! दोस्त नावाचा फार्मूला तयार व्हायला विजय पोहणेरकर नावाचं bond पण आवश्यक आहेच !!
सर आज वाढदिवस साजरा करताहेत . वय वाढल्यावर कसं जगायचं सरांनी खूप दा सांगितलेय .... चाळीशीच्या कविता ,पन्नाशीच्या कविता , आता upcoming साठीच्या ....... गोवा ट्रीपला जाताना पर्यटकांनमध्ये हवा भरण्यासाठी त्यांनी सगळ्यांना जगण्याची प्रेरणा अशी दिली ....
नव्यानं आयुष्याकडे बघायला हवं
आपण आपल्या मनासारखं जगायला हवं
मनासारखं जगणं म्हणजे स्वैराचार नाही
हे सांगत असतांना ....
याचा अर्थ असा नाही कुणाचाच विचार नाही
सांगायला ते थकत नाहीत
सगळ्यांच सगळं करतांना
एकमेकाला जपावं
काम थोडं बाजूला ठेवून
गप्पा मारत हसावं
पुन्हा पुन्हा नवीन काही करायला हवं
आपण आपल्या मनासारखं वागायला हवं
केस पांढरे झाले तरी
पावसात भिजा वाटलं पाहिजे
सुरकुत्या पडल्या तरी
फेशियल करून नटलं पाहिजे
हौस मजा करत करत जगायला हवं
आपण आपल्या मनासारखं जगायला हवं
सरांच्याच रचनेतली वाक्य आहेत वरची !! असंच जगणं सरांच्या वाट्याला सतत येऊ देत हेच जगदंबे कडे मागणं !
दीर्घ निरामय आयुष्याच्या शुभकामना !
ता क : आम्हाला कविता करणे शक्य नाही !!सर स्वतःच्या वाढदिवशी स्वतः वरच एक रचना व्हायला हवी . स्वतः च स्वतः ला शुभकामना द्यायला हव्यात खास पोहणेरकर स्टाईलमध्ये !!!
कारण तुम्ही अस्मादिकांवर , सौ मीनल , सौ शुभांगी वर रचना केल्यात अगदी शास्त्री परिवारावर गीत लिहिलेत ....अन इकडे तर प्रतिभेचा वाणवा !!
तुमच्यावर कविता तुमची जबाबदारी !!!!!
-
मंगलमुर्ती शास्त्री
सौ मीनल शास्त्री
शुभांगी वझरकर
अजित वझरकार
No comments:
Post a Comment