वडोद्याला बळीराम्बॉ च्या पत्या च्या लग्नाला गेलतो , बापा बापा
सकाई 10वाजेच लगीन . सकाई पाच वाजेलाच औरंगाबाद हुन निगलो , तसं बी एक दोन घनटे तर लगीन लागायले लागतेच किनी बॉ !म्हणलं मीयुन जाईन .
खामगाव नांदुरा खांडवी च्या रोडाणं दरमजल करत पोचलो साडे बाराले वडोद्यात . बिगी बिगी धापा टाकतच एस्टी तुन उडी मारून पयालो , लगन सापडलं तर सापडून जाईन म्हनलं . ...... तो बैराम बॉ चौकातच भेटले . दोनी पायावर बसेल , बहुतेक खाली मुंडकं घालून विडी फुकत बसेल व्हते .
त्याहिले बोल्लो का लगन लागलं वाटते ? थ म्हणले नाही न भाऊ . लाईन मन म्हणते दोनाले लाईट देतो . माईक भोंग्या बिगर लगन कसं लावता .
माया जीव भांड्यात पडला . म्हंजी लगन दोन वाजेपतूर लागे ना . आपण दुरून जाऊन गाठलं .
पण बॉ इकडं काय करत व्हते चौकात . त्यायच्या घरी मंडप आसन ना . पौने रावळे सोडून बुवा इकडं कुठं ! मायी मनात पाल चुकचुकली . कायी तरी गडबड हाय .
बिगी बिगी घरी गेलो तो ... कयलं बुवाचे सात का पाच जावाई रुसून बसेल होते , कुनाले मुदी पैजे व्हती त कुनाले सफारी .
मधले तीन जावई तर अशे रुसले व्हते का त्यायच्या साठी आनेल पहिल्या धारेची कॅन मास्तरनं लपून थेवल व्हती . गावातलं हे रघु मास्तर पण फार बिगडेल व्हतं !! आता बुवांच्या घरचं लगीन मास्तर न कायला मदे मदे करा ! बैराम बॉ मास्तरचं सेतावर काम करे , अन पत्याच्या लगनाला कायी मदत बी देल्ली आसन , पन मनुन का कायदे कानून सिकवा का ? बुवाचे सगळं जावई वैतागेल होते कारन मास्तरन सांगतलं व्हतं का लगन लागल्याबिगर दारू सारू नै .. तिकडं लाईन मन लाईट देत नोता इकडं मास्तर टाईट हु देत नोता .
तवा माया ध्यानी आलं का लगन घर सोडून बैराम बॉ चौका मंदी विडी सिलगाऊन का बसेल व्हते !!!
पत्याच्या लगनाची पंगत जेवलो, मावशीच्या घरूनच वाटी पेला नेलता ! बुवाच्या घराच्या मागल्या गल्लीत पंगत होती बहुदा तिथं जेवलो . लाईन मन च काई मन झालं नई का लवकर लाईन द्यावी . चार वाजोले त्यानं . मायी परत जा ची गाडी साडेतीनाची . दोनशे मैलावरून लग्नाले गेलतो . टायमात गेलतो पन लगन काई लावू शकलो नाई . परत आलो, हाय कीनी मज्जा ....
- अगस्ती

No comments:
Post a Comment