कृतज्ञ आम्ही कृतार्थ आम्ही
मा देवेन्द्रजी
आम्ही संभाजीनगर वासीय आपले आभारी आहोत .आपण राज्य सरकारचे दायित्व आपल्या खांद्यावर घेतल्यापासुन शहर विकासासाठी मा आ अतुल सावे यांचे पाठीशी उभे राहिलात !
अतुलजींनी मागणी करावी आणि आपण पूर्तता .
सर्व प्रथम रस्त्यांसाठी 25 कोटी दिलेत, ते पूर्ण झाल्यावर आणखी देण्याचे वचन दिले . श्रेयासाठीच झगडणाऱ्या महापालिकेने रस्ते पूर्ण करण्यास वेळ घेतला !
त्यानंतर 100 कोटींची बेगमी आपण करून दिलीत . त्या रस्ताकामाच्या उदघाटनाला महापालिकेला 19च्या जानेवारीचा मुहूर्त मिळाला . या रस्त्यांची कामे लवकर पूर्ण होवो व आणखी निधी देण्याचा आपला मनोदय पूर्ण होवो !
गुंठेवारी भागात विकास कामासाठी परवानगी देण्याबाबत मा अतुलजींनी पाठपुरावा करताच आपण परवानगी दिली .त्याचे फळ सर्व गुंठेवारी भागातील रस्त्यांच्या व अन्य कामात बघायला मिळते !
कचऱ्याचा प्रश्न आपणाकडे पोहोचला आपण तत्परतेने 90 कोटी दिले . कचऱ्यावर प्रक्रिया सुरू व्हावी यासाठी आपण त्याचा फालो अप घेतलयाचे कळते .
सिडको भागातील नागरिकांना नुकताच आपण मालकीहक्क प्रदान करण्याचा निर्णय घेतला .आणि सिडकोवासींयांच्या आनंदाला उधाण आलाय ! नुसते श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला मात्र आपल्याशिवाय कुणी हा प्रश्न मार्गी लावू शकणार नाही हे आम्हाला ठाऊक होते .मा अतुलजींचा पाठपुरावा कार्यरत झाला ! सिडको वासीय कृतकृत्य झाले .
स्मार्ट सिटी प्रकल्पात संभाजीनगर यावे यासाठी आपले योगदान आणि त्यानंतर सिटीबस त्या प्रकल्पात अंतर्भूत करण्यासाठीची आपली भूमिका आपल्या दूरदृष्टीची साक्ष देते !
आम्ही मंदिर प्रश्न आपणा कडे पोहोचवला आपण मार्ग काढण्यात उत्तर शोधण्यात जी तत्परता दाखवली आमच्या भावना जपल्या सर्व संभाजीनगरकर आपले कृतज्ञ आहोत .
या शहरावर मा अतुलजी सावे यांच्या सह आम्हा कार्यकर्त्यांच्या सर्व मागण्यांबाबत आपण नेहमी सकारात्मक राहिलात ! शेवटी एवढेच ...
कृतज्ञ आम्ही ! कृतार्थ आम्ही !!!
देवेन्द्रजी आप आगे बढो हम तुम्हारे साथ है
- मंगलमुर्ती शास्त्री भाजपा मंडळ अध्यक्ष
No comments:
Post a Comment