पानं

Thursday, May 18, 2023

नाना मामा 18 मे 2023

 चल पथिक खुद राह बना तू 

परछाई को हमाराह बना तू   ।


 " नानामामा ' म्हणजे समजदार,

सहनशील , सहृदय व्यक्तित्व! 

मला माझ्या लहानपणीचा मामा तेवढा आठवत नाही जितका माझ्या दहावीनंतरचा ! 

त्याचे लग्नानंतरची नानामामाची अन् माझी जवळीक . त्यामुळे सहनशील मामाच आठवतो !!! क्रेडिट गोज टू संध्यामामी असं मला मुळीच  म्हणायचे नाही 😜 !!!!! 

        दर्यापुरचे माझे शिक्षण अन् पालकत्व नानामामा कडे ! अगदी तेव्हापासूनच एक समजून घेणारे अन् सहनशील व्यक्तिमत्व मी अनुभवले . अर्थात त्याच्या सहनशीलतेचा गैरफायदाही भरपूर घेतला ! पालक म्हणून कधी त्यानी त्रास दिलेला नाही ! कधी अभ्यास कर म्हणाला नाही का कधी  खेळायला जाऊ नको बोलला नाही ! 

       अर्थात आजही पटकन पाठीशी उभे राहायला तयार , भलेही अगस्ती कितीही आगाऊपणा करत असेल !!! 

           " आया उसका भाला न आया तो उस्सेभी भला ' या त्याच्या उक्तीला मी स्वतः आचरणात आणतो! त्यामुळे स्वतःला त्रास होत नाही . तो माझ्याकडे आला नाही तो तिकडेच का गेला वगैरे फालतू भानगडीत आम्ही पडत नाही . चल पथिक राह बना तू ... सोबत यायचे तर ठीक नाहीतर ठीकच! 

          राग , कपट त्याच्याकडून कधी अनुभवायला मिळाले नाही .  कदाचित डब्ब्या मध्ये त्याच्यावर वेळ आलो असेल ,  पैसे विसरावेच लागत असतील असा स्वभाव ! "सोडून देणे ' नाना मामा कडून शिकावं!! त्यामुळे शांततेत आतापर्यंत त्याची नैय्या पार झाली ... अन् अशीच दूर दूरपर्यंत  जाओ !


ति. नानामामाला उदंड निरामय आयुष्य लाभो हि बालाजी चरणी प्रार्थना .

No comments:

Post a Comment