तन मन धन सर्वस्व समर्पित
बने राम का धाम , भव्य राम का नाम !
अवध पुरी मे फिर से मंदिर
जय जय जय श्रीराम !
एक महिन्यांपूर्वी संपूर्ण देशात रामजन्मभूमी साठी घरोघर फिरणाऱ्या , समर्पित रामसेवकामध्ये एक नाव ओमप्रकाश बिहारीलाल अग्रवाल ।
खरंच ओमभाई ना फक्त सांगा इकडे चेक मिळणार आहे तिकडे काकू पैसे घेऊन तयार आहे ओम भाई तात्काळ पावतीपुस्तक घेऊन हजर .
रामासाठी असेल , हनुमंताचे मंदिर असेल , प्रकटदिन, गौरीपूजन असेल अथवा घरची पूजा असेल ओमभाई मनोभावे आपसूक जोडलेले ! कंटाळा दूरपर्यंत नाही .
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेचे बऱ्यापैकी नियमित स्वयंसेवक . कट्टर हिंदुत्वअभिमानी , गोमाता रक्षक .
ओमजीना रात्री 12 वाजता सांगा उद्या भद्रा दर्शनाला जायचेय ओमभाई हजर असणारच .
भारतीय जनता पक्षाचे दायित्व वॉर्ड अध्यक्ष म्हणून निभावताना आपण एका वॉर्डाचे अध्यक्ष असताना इतरही ठिकाणी मी पक्षाला कशी मदत करू शकतो हे पाहणारे ओमभाई , आम्ही गंमतीने त्यांना जिल्हा वार्डाध्यक्ष म्हणत असतो . पूर्व पश्चिम मध्य सगळ्या मतदारसंघात ओमभाईंचे मित्र भेटतील ....
व्यवसाय करताना मुळीसुद्धा दुर्लक्ष होणार नाही याची काळजी करत बाकी सर्व व्याप सहज सांभाळणारे ओमभाई , पक्ष ,संघ ,क्लब , सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असतात .अन वैशिष्ट्य असे की घर गृहस्थी सुद्धा तेवढ्याच ताकदीने पेलवत असतात . स्वतः च्या मुलींना चांगले शिक्षण कसे देता येईल यासोबतच भावांना सुद्धा सोबत घेऊन त्यांच्या सुखदुःखात समरस असतात ....
मित्र परिवार मोठा जपणारे ओमभाई वॉर्डातल्या समस्यांना सुद्धा उत्तर मिळवत असतात अन त्या साठी पक्षविराहित मैत्रीही जपतात .
शारीरिक बांधणी पाहता सगळ्या कामांमध्ये एकदम चंटूकडे कसे राहतात याचेच आश्चर्य . फार क्वचित दुखणे ते ऐकवतात .
ईश्वर त्यांना असेच " चंट ' ठेवो , त्यांच्या हातून अशीच ईश्वरसेवा घडो , दिर्घ निरामय आयुष्य लाभो अन आम्हालाही अशीच ओमभाईंची सुसंगती सदा घडो ...या साठी आई जगदंबे चरणी प्रार्थना . प्रार्थनामहें भव शतायु:
- मंगलमुर्ती शास्त्री