काही वर्षांपूर्वीची ही गोष्ट आहे
रात्री आमचे जालन्या जवळील शेलगावचे व्यवसायिक
मित्र श्री गायके यांचा फोन आला म्हणाले शास्त्रीजी माझी भावजय ,लहान भावाची बायको एकदम सीरियस आहे काविळ झालाय चार दिवासापुर्वीची बाळंत . चांगल्यात चांगले डॉक्टर सांगा . मात्र तिला आपल्याला वाचवायचे आहे . जालन्याला ट्रीटमेंट केली , मात्र काही उपयोग नव्हता म्हणून अडूळ जवळ एका काविळीवर औषध देनारया माणसाकडे आणले तिथे ती सीरियस झालीय . आता कुणी डॉक्टर सांगा पैशाची काळजी करू नका मात्र ती वाचली पाहिजे .माझ्याही सौचा वर्षभरापुर्वी बाळन्त झाल्यावर काविळीन घात केला आता भावजय ! सेम सिचुएशन सेम किस्सा ... मित्र एकदम रडवेल्या स्वरात बोलत होता . माझ डॉक्टरांबद्दलच ज्ञान तोपर्यंत बेताचच होत मग काहीही झाले तरी डॉ हेडगेवार रुग्णालय आम्ही जवळ करणार . मी त्याला तेथेच घेवून जाण्यास सांगितले . त्याने ऐकले रात्री भरती केले डॉ फाटकांची ट्रीटमेंट सुरु झाली . मी रात्री घरी जातांना त्याला भेटलो धीर दिला . त्याच्या सोबतची खुप सारी मंडळी घरी गावाकडे पाठवली म्हटल इथे आवशक्ता नाही . ...
दुसऱ्या दिवशी त्याला भेटायला रुग्णालयात गेलो विचारपूस केली .
त्या दिवशी महिन्याचा शेवटचा गुरुवार होता . त्याकाळी आम्ही घरी व्याख्यान / बौद्धिक आयोजित करत असू . त्यादिवशीच्या नियोजनासाठी रुग्णालयात होतोच म्हणून एन डी सरांना भेटण्यासाठी त्यांच्या केबिनकड़े गेलो सोबत मित्र होताच . सरांच्या केबिन बाहेर नेहमी प्रमाणे खुपसारे पेशंट पाहिले अन आपला धुडगुस त्यामध्ये नको या विचाराने माघारी परतलो तो त्यांच्या अटेंडंटनी हाक मारली मला ओळखत होता म्हणाला काय काम होत ?
"या बसलेल्या पेशंट्स पेक्षा महत्वाच काम नाही मी घरी भेटेल . " इतक्या लोकांच्या मनातल्या मनातच्या शिव्यांचा धनी मला व्हायचे नव्हते !
सर तुम्ही आत जा तेव्हढेच सर रिलेक्स होतील , सकाळी ओटी केली आता ही ओपीडी . सरांना ज़रा फुरसत नाही . तुम्ही इतर कामासाठी आलात तर नक्की आत जा !! ' त्याची काळजी मला एक वेगळाच आनंद देवून गेली .
मी पुन्हा सरांकड़े गेलो . सरांचे पेशंट आणी आम्ही असा संवाद सुरु . मधेच प्रा पांडव सरांना फोन करून त्यांचीही व्याख्यानासाठी वेळ घेणे झाले आमच्या रात्रि 9 वाजताच्या कार्यक्रमाचे नियोजन झाले . मी ओपरेशन पश्चातचे पेशंट पहात आहे ओपीडी नाही . व्याख्यानाला डॉट पोहोचतो " वगैरे सांगुन झाले. आम्ही निघताना सोबतच्या मित्राबद्दल विचारले . अरे हो त्याची तर ओळख दिलीच नव्हती ...
थोडक्यात मित्र भावजय डॉ फाटक ..सांगितले तो अरे आज डॉ फाटक गावाला गेलेत म्हणत त्यांनी वार्डात फोन लावून मित्राच्या भावजयिची चौकशी केली तिथल्या स्टाफला आवश्यक सूचना केल्या .
मी घरी परतलो आणी श्रोते जमवण्याच्या कामाला लागलो . रात्री डॉट 9 ला सरांना व्याख्यानाच्या आठवणी साठी रिंग दिली . मात्र एन डी सर आले नाहीत .... आम्ही किंचित हिरमुसलो, मात्र सेवाव्रती सरांना सर्वात आवडता विषय इमर्जन्सि पेशंट मिळाला असणार हे कुणी सांगायला हवं का ? बौद्धिक छान झाले उपस्थिति चांगली होती मात्र सर नव्हते एक रुखरुख .
रात्री कार्यक्रमा दरम्यान मित्राचा फोन आला म्हणाला डॉक्टर ओपरेशन करायच म्हन्तेत काय करू ? मी डॉक्टरांवर विश्वास ठेव सांगितले अन फोन बन्द केला ! व्याख्यानात व्यत्तय नको !!!
सकाळी दुकानात जाताना रुग्नालयाजवळ मित्र भेटला अतिशय आनंदात होता " लय भारी डॉक्टर भेटला बघा ' त्याच्या भावाजयीच तातडीनं ओपरशन करून छातीतील 2 लीटर पस काढन्यात आला होता ! तो काविळीचा रुग्ण नव्हताच मुळी ! ! शरीरातील घाण निघाल्याबरोबर पेशंट टकाटक .
... समोर एन डी सर दिसताहेत कालच्या "डॉट' प्रोमिसचे काय झाले विचारणार तोच ..
बरं झाल तुम्ही रात्री रिंग दिली मी पोर्चं मधून बाहेर पडतच होतो मला फाटक डॉक्टरांचा पेशंट आठवला परत वार्डात गेलो तो काविळिचा पेशंट नसून छातीतील पस मुळे हां त्रास होता हे लक्षात आले ओपरेशन सक्सेसफुल !!
मी नतमस्तक झालो . सगळेच सर्जन अशी सर्जनशील सेवा देतील तो ?
मित्राची बायको याच आजाराने बाळन्तपनानंतर आदल्या वर्षी बाळाला सोडून गेली होती . बाळन्तपनानंतरची घ्यायची काळजी न घेतल्यामूळे !!
जालन्याहुन नंतर परततांना शेलागावला थांबलो असता आमचा सत्कार करण्यात आला शाल अन सौ ना साडी चोळी ! मिळाली ज्याचे धनी सर होते . अतिआग्रहामुळे आम्हांस स्विकारावी लागली . दगडाला शेंदुर फासून इश्वर त्यांना गाठायचा होता !!!
एव्हढे सगळे सांगायचे कारण की .
अनेकांसाठी तारणहार इश्वर आमच्यासाठी संतत्व धारण केलेले इतरांच्या आनंदात आपला आनंद माननारया, आमच्या माननीय नगरसंघचालक डॉ नरेन्द्र दत्तात्रय कुलकर्णी उर्फ़ एनडीसर यांचा आज वाढ दिवस ! त्यांना दिर्घायुष्या साठी प्रार्थना करतो . सुदिनम सुदिनम जन्म दिनम तव ... म्हणत शेवटी एवढेच ---
जीवन की मुस्कान हो तुम
फूल खिलाते हो
क्यारी क्यारी ।
नयी सफलता के
सुमनो से
महके जीवन की
फुलवारी
- मंगलमूर्ती ,सौ मिनल , शुभांगी शास्त्री परिवार

No comments:
Post a Comment