चंटूकडी मावशी
एकदा अमरावतीला असताना वेळ कमी होता अन सगळ्या मामा मावश्याचे दर्शन महत्वाचेच अस्मादिकांना!
“ मावशी तुझ्या हातचा मेथीचा कोरडा खायचाय. .. आणि चंदुमामाही सोबत हवा ‘
” काही हरकत नाही तु पोहोच मी कोरडा तयार ठेवते अन सोबत येते चंदूकडे. ...’
गाडी खाली लावावी अन फोन करावा आमची माईमावशी तयार. अगस्तीला काय खाऊ घालायचे तें सोबत घेऊन. थांब मला साडी बदलायची राहिली वगैरे नाही. जशी आहे तशी .
मला कोण परत आणून घालणार वगैरे प्रश्न तिला पडत नाहीत तू तुझा निघून जा. ....
तिथे निखळ प्रेम स्नेह मिळेल. माझ्याच घरी तु यायला पाहिजे अन इथेच जेवला पाहिजे याची आवशक्ता नाही.
अन तेही एनवेळी कळविल्यावर कुठेही तक्रार नाही. तिच्या वयाच्या व्यक्तींना फोन करावा तर सहसा माझे काय अन कसे दुखतंय याची त्रासभरीत वर्णनं एकणे क्रमप्राप्त असतें. मात्र माई मावशी कडून अशा तक्रारी मला तरी ऐकायला मिळाल्याचे आठवत नाही.
. मामांमध्ये जसा दादा मामा तसं मावश्यामध्ये माई मावशी ‘एव्हर रेडी “ अन दोघेही चंटूकडे ! आजही ”चला आपण असं करू तसं करू ’म्हणा कधीही कारणं देत बसणार नाही उगाचच !!
. तर अशा या मावशीचा वाढदिवस.
मावशीचा आणखी एक पैलू म्हणजे सृजनात्मकता अन कल्पनाशीलता. नवनवीनतेचे तिला असलेले आकर्षण! लहानपनापासून “माझ्याजवळ या आकाराचे हे बुटले तर नाहीच आहे. . तें असले पाहिजे ‘ नवनवीन खाद्य पदार्थ बनलेच पाहिजे .... माझ्याच नशिबी खेड्यातले जिने हि तिची खंत, नातवाने पार मुंबई घडवून धुवून काढली . तिची हौस. ... मावशीला हौशी खुप ! हे करायचं तें करायचं . त्या अर्थानं पोरं म्हातारी होतील पण माई मावशी नाही. जाऊ दे कंटाळा आला हे शब्द तिला बोचतात म्हणायला हरकत नाही. हा माझा अनुभव आहे .
समोरून भोपळ्यांचा ट्रक चाललेला दिसला. .. मला माई मावशीची “चव ‘ आठवलं. एकंदरीत भोपळ्याला चविष्ट बनवणारी मावशी, देवाने तिच्या हातालाच चव दिलेली. साधी साबुदाण्याची उसळ अलायस खिचडी थोडीशी तिखटच मात्र मावशीच्या हाताचीच खावी. मुलांचे नातांचे लाड करावे तें मावशीनेच.
मावशी ला वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा शुभ कामना! आई रेणुके कडे इतकेच मागणं. ....
मान दे ,सम्मान दे ,सज्जनते हित दे !
सुख दे ,समृद्धी दे ,सर्वांची साथ दे !
शांती दे ,शक्ती दे ,भक्ती भरपूर दे !
धन दे धान्य दे, आरोग्य संपदा दे !!
निरामय जगू दे शतायुषी होऊ दे !!!!
- अगस्ती मिनल
No comments:
Post a Comment