17 एप्रिल 2024
या वेळेची राम नवमी सर्वार्थानं वेगळीच ठरली . अयोध्येत राम लला विराजमान होण्याची पार्श्वभूमी जशी लाभली तशीच आपल्या गृपवर मल्हारने आपल्याला सुखद असे कॉन्वकेशन फोटो अन् व्हिडिओ पाठवून आम्हाला आनंद दिला अन् अर्थातच डॉ मल्हार मानसी मनीष देशपांडे डॉक्टरांमधला नटसम्राट किताब सोबत घेऊन आल्यानं आमची रामनवमी सुखावली . अभ्यास एके अभ्यास एव्हढाच ध्यास घेतला तरच एमबीबीएस होता येत इतकचं आम्हाला ठाऊक !! अभ्यासासोबत एक्स्ट्रा ॲक्टिव्हिटीज अन् त्याची पावती ,त्याही कॉलेजचा एक वर्षाच्या इंटरनशिप गॅप नंतर सर्व सहशिक्षार्थी प्रचंड टाळ्यांच्या गजरात स्वागत करतात हेच मुळी आनंददायी . मानसी मनीष ची तब्येत खुश ! आता वाट पार्टीची !!
अन् दुसरा आनंद हि रामनवमी देती झाली ह भ प कल्पक पिंगळे महाराजांच्या रूपानं!
प्रोफेशनल क्वालिफिकेशन त्यात स्वतःच्या कंपनीचे संचालन करणे , आयटी त काम करणाऱ्या व्यक्ती कडून , बक्कळ पैसा खिशात बाळगून हि मंडळी असतात म्हणून ... आणि अशी पार्श्वभूमी मला असती तर माझ्यातला सामान्य सीसीडी, मॅक डोनाल्ड , ते दिल्ली दरबार ते रात्र समयी कामाचा ताण खूप आहे यार म्हणत एखादा
" बार ' जवळ करता झाला असता !! थॅन्क्स गॉड त्यानं माझ्या कडे असा बक्कळ दिला नाही !!!.... तर कल्पक नी वाट वळणाची निवडली . इतर बार टाळत त्यानं राम दरबार जवळ केला अन् एका ह भ प चा जन्म झाला ! अन् आम्हीही बॅनर वर कल्पक पिंगळे महाराज
( BE ) अशी त्याची डिग्री टाकत प्रसिध्दी करते झालो . इंजिनिअर अन् ह भ प या कुतूहलापोटी आम्ही श्रोते मिळवले हॉल गच्च झाला बाहेर सुद्धा बऱ्यापैकी खुर्च्या लोकांनी जवळ केल्या ...
....अन् महाराजांनी नारदीय कीर्तन परंपरेचे विवेचन देऊन प्रारंभ केला . कीर्तन परंपरा नारदांनी सुरू केल्याचे अन् नवविधा भक्तितील एक मार्ग " किर्तन ' विस्तृत सांगत श्रोत्यांना हुशार केलं . ...
नारदीय कीर्तन पद्धतीमध्ये सुरुवातीला मंगलाचरण म्हणजे इष्ट देवतेच (गणपती,राम,वैगेरे.) स्मरण. त्यानंतर नमन म्हणजेच सद्गुरूला वंदन. पुढे भजन, जयजयकार (हरिनामाचा) आणि पूर्व रंगास सुरुवात. हा पूर्व रंग जवळपास तासाभराचा असतो. यामध्ये पदयात व गद्यात अभंग किंवा श्लोक म्हटला जातो व त्या श्लोकाचे विवरण (स्पष्टीकरण) केले जाते. नतर छोटासा मध्यांतर होऊन उत्तर रंगास आरंभ होतो. या उत्तर रंगामध्ये पूर्व रंगातील अभंग किंवा श्लोकातील मर्म अधिक स्पष्ट करून सांगण्यासाठी आख्यान सांगितले जाते. आख्यानातील कथेला मजेदार करण्यासाठी कथेनुरूप पद, दिंड्या, आर्या, ओव्या, लावणी, आजकाल सिनेमाची गाणी पेरली जातात. अन् खुसखुशीत स्वाद दिला जातो . ... वगैरे सांगितल्या वर समर्थांची ओवी पूर्वार्धात महाराजानी घेतली
मना मत्सरे नाम सांडू नको हो ।
अती आदरे हा निजध्यास राहो ॥
समस्तांमधे नाम हे सार आहे ।
दुजी तूळणा तूळिताही न साहे ... 81 वी ओवी समर्थांची .
आज रामनवमीला रामकथा महाराज सांगणार होते अन् हे काय यांनी सुरू केले . अस्मादिक किंचित घाबरले सुध्दा !! अनपढ गवार अगस्ती . .. लोकांना जमवायचे महाराजांचे नाही नाही ते कौतुक करायचे अन् रामकथा ऐकायला आलेल्या मंडळींना ... मत्सर वगैरे समर्थांची ओवी नी सुरवात. .. महाराजांनी "कल्पक ' तेनं पूर्वार्ध सजवला . अन् राम जन्म कथे शी सांगड घालत मनातल्या मत्सर ला कशी अन् का तिलांजली द्यायची सुरेख शिक्षित केलं . रामजन्म होऊन सुश्राव्य कीर्तनाची सांगता झाली . ... कल्पक नी बोलत रहावं बास्स!!
कल्पक आफळे बुवांच्या तालमीतला पठ्ठ्या मग खुसखुशीत मेजवानी तर मिळणारच. ती त्यानी दिली . स्टेजवर मग आपसूकच त्याला प्रणाम घालायला लागला नसता तर नवल . रात्री उशिरापर्यंत लोकं कार्यक्रम देखणा झाल्याचं सांगत होते माझं उर भरून येत होतं. किंचित वजनही वाढलं असेल हभप कल्पक महाराजांच्या मेहनतीनं .
तर अशी एकंदरीत यावेळची रामनवमी सुफळ संपूर्ण होती झाली. लोकाभिरामं रंरगधीरं राजीवनेत्रं रघुवंशनाथम् ...
अश्या रामाने खरंच खूप काही दिले एकीकडे हभप तर तिकडे नटसम्राट . रामकृष्ण हरी पांडुरंग हरी ...
कल्पक अन् म्हल्ल्या दोघानाही धन्यवाद ... रामनवमी सजवल्या बद्दल !!
मनापासून अभिनंदन
वंद्य वंदे मातरम् . भारत माता की जय .
(सदर कीर्तन एफबी वर सध्या आहे लवकरच युट्यूब वर अवतरेल .)
- अगस्ती
No comments:
Post a Comment