एक असा पदार्थ ज्यात
साखरेची गोडी आहे ,
ज्याची निर्मिती फुलात होते
ज्याला फुलपाखरुखाद्य म्हणता येईल ,
हमिंग बर्ड खूप लांब भराऱ्या मारतात आकाशात
मात्र यांच्यासाठी जमिनीवर पोहोचतात
मोठी लांब चोच फुलात घालून ज्याला शोषतात ,
आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा माझ्यादृष्टीने कारण....
मधमाशा त्या पासून मध बनवतात !
काही कीटकभक्षण करणारे पक्षी याचा उपयोग
किड्यांना आपल्या कडे आकर्षित करण्यासाठी करतात !
अतिशय सूक्ष्म पदार्थ आहे पण भुरळ घालणारा प्रत्येकाला ....
असं आमच्या विकिपेंडिया सौ मीनल माहिती देतात !
याला *पराग* म्हणतात !!
परागचा वाढदिवस म्हणून परागचा अर्थ विचारला
समर्पक उत्तरही मिळाले
घरात सर्वात बारका / सूक्ष्म ...
लांब लांबच्या सगळ्यांचा लाडकाही ,
पगार चांगला आणतो खर्चही चांगला करतो
मधाळ आहेच !
आपल्याभोवती माणसं गोळा ही करतो
अच्छे अच्छेकांना ज्ञान पाजतो !
तरीही लळा लावतो .
त्याच्या सर्व कामना पूर्ण होवोत
उदंड निरामय आयुष्य त्याच्या बडबडी सह चिरायू होवो !
हेच आज आई रेणुकेला , पहिल्या माळेला मागणं
सौ मीनल
अगस्ती
(शुभांगीनी आज फोटो पाठवला नाही म्हणून तिचं अजितच नाव पोस्ट मधून वगळतो 😄)
पराग एवढं लिहिलं निवडणुकीच्या गडबडीत , घरी सवाष्ण ब्राह्मण यांची वाट पहात...... मध्येच काकड्या, दही, खवा वगैरेची व्यवस्था लावत .....किमान गुळपट्टी तरी पाठव प्रशांतच्या हाती !!!

No comments:
Post a Comment