पानं

Tuesday, November 28, 2017

पोहनेरकर सर वाढ दिवस शुभेच्छा

तो

जिंदादिल  आहे

कलन्दरीला त्याच्या उन्माद  आहे 

मनस्वी तर आहेच

मुशाफिर सुद्धा आहे

मिस्कीली त्याची नेहमीच दाद घेते

भावनिक असणे क्रमप्राप्तच आहे

हळवा आहे , त्याच्यात कळवळा आहे

ऑर्गेनिक असणे हे प्राक्तन आहे

गरीब स्वभाव  बाळगुन आहे

श्रीमंत मनाचा आहे .

स्वरप्रेमी आहे, सरगम त्याचा प्राण आहे

कवि आहे , कविता हा त्याचा छंद आहे

दोस्त आहे , "मैत्र ' त्याच्यात ओतप्रोत आहे

" जाणिवा ' जपनारा आहे

चव जपणारा आहे .

वाहवा करण्यात निःसंकोच आहे

मानसात रमणारा आहे

पर्यटक आहे

खेळाडू आहे

कुटुंब वत्सल आहे .

यशस्वी आहे, यश वाटतो आहे

आनंदी आहे ," हसु' देतो आहे .

" आसु' (जाणिवा) वाटतो आहे

माणूस आहे

माझा परम मित्र आहे , मी नशीबावान आहे .

... इतकं सगळं लिहिताय सरांबद्दल तर नाही ? -इति सौ मिनल . अरे हो आज त्यांचा वाढदिवस . शुभ शुभ म्हणुयात दिर्घ निरामय आयुष्यासाठी ! प्रा विजय पोहनेरकर सर जन्मदिनम तव सुदिनम, सुदिनम...
                       - मंगलमुर्ती शास्त्री

No comments:

Post a Comment