पानं

Tuesday, November 7, 2023

सनी मृत्यु लेख

 तु मुका आहेस कधीच जाणवू दिले नाही दहा वर्षापूर्वी तु आलास अन् आम्हाला चैतन्य दिलास . .. मुकुंद सरांच जोशबर्ग !!!

     तुझी भाषा आम्हाला अवगत व्हायला वेळ गेला मात्र आमची भाषा तू पटकन आपलीशी केलीस ... तुझ्या अवखळ , नटःखट वागण्याने आम्ही तुझ्या शिवाय विचार करू शकत नव्हतो .
     तुझ्या उड्या, लोळण घेणं आमच्या शालूताईनी तुझे नामकरण दत्तगुरु जवळचा "ऋग्वेद ' असे केले होते मात्र आम्ही तुला सनी नामाभिदान दिले . तू दहा वर्ष जबरदस्त बॅटिंग केलीस !
    उटीच्या अखिल भारतीय डॉग शो मध्ये गेलास अन् सात मेडल आणलीस ... ओबीडीएंट म्हणून नावलौकिक शेवट पर्यंत कायम ठेवलास .
    तुझ्या देहबोली मुळे तू कितीही कोमल स्वभावाचा असला तरी , येणारी मंडळी घाबरत होती . तू कधीही मनुष्यमात्रावर ओरडला नाही भुंकला नाही तरीही येणारी लोकं पळायला लागली अखेर तुला घरातून बाहेरच्या खोलीत... अर्थात तुझ्या  खोलीत अन् मागील अंगणात तुला मालकीहक्क दिले गेले मात्र बंदिस्त केले गेले ! तो तुझ्यावरचा अन्याय होता .
    तुला माणसं लागायची खेळायला , बोलायला,  सौ मिनलला पोटचा पोरगा काय प्रेम देईल इतकं प्रेम दिलस सतत तिच्या आसपास असायचास. तिची बाहेर गावी जाण्यासाठी बॅग भरण्याचा अवकाश की तू सुस्त व्हायचा , तिच्यावर मी ओरडलो की तू डोळ्यातून पाणी काढायचा!  गमतीने सुद्धा तिला रागावू द्यायचा नाही ... गंभीर व्हायचा !
    शुभांगीच्या हाकेला आता कोण  निरपेक्ष  प्रतिसाद देईल. अजित घरी आल्यावर घरतल्या सोबत न बोलता पहिले तुझ्याशी संवाद साधायचे .... सतीश सरांच्या "अबे ओ सन्या ' हाकेला कोण " ओ ' देईल. स्व सुभाष सोहोनी ज्या दिवशी गेले त्या दिवशी अंत्यविधी हून परतल्यावर तुझ्या आसवाना मी विसरू शकत नाही . तुला प्राणी का म्हणायचे हाच प्रश्न पडावा.  स्व सुभाष गेला ते तिसऱ्या ठिकाणी .. तुला कसे कळले . मात्र तुझे अन् त्याचे बंध दिसून आले त्या दिवशी !!
      लॉक डाऊन ची तीव्रता तुझ्या मुळे जाणवली नाही खूप पळवायचा आम्हाला अंगणात अन् आमची तब्यत सांभाळायचा !
     अन् आज सर्वांना सोडून गेला . गेले दीडेक महिन्यापासून तुझे उपचार सुरू होते .. राहुल गायकवाड/मोहरील , देवका यांचे परिश्रम   अन् सौ मिनल नी दिलेल्या सेवेला तोड नाही  पण तू रिस्पॉन्स दिला नाही तुझ्याही ते हाती नव्हते बहुदा !
    होय जाता जाता तु आम्हाला मोठ्या प्रमादातून वाचवलेस , क्रित्येकानी आग्रह केला त्याला ईच्छा मरण द्या ... मन होत नव्हते ... तू वाचवलेस !!
    
  केनेल क्लबचा (KCI) चा GUNPOWDER गन पावडर आमचा ऋग्वेद उर्फ सनी आज माती आड झाला . ओम शांती




मंगलमूर्ती शास्त्री