आज परागचा वाढदिवस अन "अगस्ती दादानी काहीच कसं लिहिलं नाही?' राणीला नक्की खंत असेल ..दोघेही घरात दिवटे !!! पराग वयानं अन राणी ... जाऊ देत पुन्हा राणीची उंची का काढायची !!!
तर पराग , सगळ्यात लहान शास्त्री ! "जाऊ दे नं दादा मला घरात कुणीच कधी सिरियसली घेत नाही ' म्हणत सगळ्यांना आपले म्हणणे नकळत सिरीयसली घ्यायला लावणारा हा दिवटा !
कुठलीही गोष्ट जर ठामपणे न अडखळता , स्वतःच्या मनात कुठलाही किंतु परंतु न ठेवता तुम्ही मांडू शकला तर अगदी तद्दन चुकीची गोष्ट , फालतू वस्तू तुम्ही विकू शकता , तुमच्या बोलण्यात ताकद " दम' असला पाहिजे .तुम्हाला व्यक्त होता आलं पाहिजे . एक्सप्रेसिव्ह पॉवर !!
पराग काहीही विकू शकतो ! तो इतरांना चूप ठेवतो , करतो , उसकी बातो मे " दम' जरूर रहता है ! असा आमचा हा दमदार भाऊ , दिलदार पण आहे ......सगळ्यात लहान आहे पण सगळे जमा झाले तर पटकन कुठलाही विचार न करता खिशात हात घालणारा !! अगस्तीचा आवडता ...
मला लहानपणी चा पराग आजही आठवतो , चुटुचुटु काम करणारा ! कुणीही काम सांगा पटकन करायचा त्याला या त्याच्या "रामागडी' अवस्थेतून भाऊंनी बाहेर काढले ,शहाने केले .पण त्यांच्यातली कष्ट करण्याची क्षमता तसूभरही कमी झाली नाही ! सर्व क्षेत्रात रुची ठेवणारा , तो जसा नवरात्रात गरबा , क्रिकेट सामने आयोजतो तसा करोना काळात ही पर्वा न करता कार्यरत असतो . स्पोर्ट्स मध्ये रुची ठेवतो तसे स्टेजवरच्या कार्यक्रमात सुद्धा रस दाखवतो , मित्र जमवन्यात त्याचा हात कुणी पकडू शकत नाही !
नाती गोती बऱ्यापैकी सांभाळतो हे ही तितकेच कौतुकास्पद आहे . सगळ्यांना हवाहवासा वाटतो !!
त्याच्यातला बोलघेवडा असाच सतत बोलत राहो ,
त्यांच्यातली उर्मी सतत बहरत राहो ,
त्याच्यातला कार्यकर्ता सतत कार्यरत राहो
यासाठी दीर्घ निरामय आंनदी आयुष्य लाभो
.......इतकीच माय रेणुके जवळ त्याच्या वाढदिवशी प्रार्थना
- अगस्ती