चंदुमामाला आणि त्याच्या "अग' ला लक्ष लक्ष शुभेच्छा ! दोघांची एकी तर जन्मापासूनच आहे बघा .एकाच तारखेला जन्मले ... त्यात आज शुक्रवार बालाजीच्या प्रसादाच्या गोड शिऱ्यात वाढदिवस साजरा होणार ,सेलिब्रेशन !
आम्हा चौघा भावंडांना मामा म्हणजे चंदुमामा .कारण आम्हाला कळायला लागले तेव्हा पहिला मामा भेटला तो हाच .बोरगाव मंजुला हेरंबाच्या जन्माच्या वर्षी मामाचे शिक्षणा साठी का आईच्या मदतीसाठी असेल कदाचित आजोबांनी त्याला पाठवले होते .आणि आम्ही मामा भक्त झालो !
माझ्या काही आठवणीत मामांनी दिवाणखान्यात आयोजिलेल्या भजन दिंडी ची आठवण .त्यावेळी तो भजन साथी साठी जायचा एकदा सगळं घर वाडा खाली होता मी अन मामा दोघेच ! कदाचित माझा तो पहिला सार्वजनिक कार्यक्रम असावा , आम्ही भजनं दिवाणखान्यात ठेवले , पाच पन्नास , शंभर लोकं आलेले ! समोर देवाची भजनं चालू अन मागे आपल्याकडे म्हशीचे दूध दवायला येणाऱ्या मामुनी आम्हाला देव दाखवले , चोरी केली ! सगळ्या जनावरांना मोकळे केले त्यांच्या नाकातल्या रस्या , बाहेरचे काही अवजारे डुंड्या , डवऱ्या चोरून नेल्या ! मग पडली मार ..... सगळे गडी घरी बसले ! शेतावर जायचे कसे हा प्रश्न पडला त्यांना ....
पोलीस हवालदार आला तो ही आम्हालाच बोलला तुम्ही घरी असतांना चोरी होतेच कशी ? एकंदारीत मामानी नन्तर कधी भजनाचे नाव काढले नसेल पक्के ! आमचा पहिला इव्हेंट असा निकाली निघाला !
मामा म्हणजे बाबीअगस्तीसाठी निरपेक्ष प्रेम ! त्यानं कधी कुठली अपेक्षा केली नाही . उलट " येणं खोलापूरला बिट्टया करतो' हा उत्साह , तो गेल्या आठ धा वर्षापासून स्वतः लॉकडाऊन असतांना देखील , दाखवतो .परिस्थिती खराब असतांना त्याने कधी रडगाणे गायलेले मला आठवत नाहीत . आजही दाल बाटीची बिटट्या पार्टी पंगत अमरावतीकरांना त्याच्याकडून असतेच असते .खूप मोठ्या मनाचा मामा !
आमच्या आईसाहेबांचं या त्यांच्या "चंदया'वर विशेष माया होतीच . तसं खूप कष्टीक जीवन जगलेल्या या मामाला ईश्वराने घरी बसवले याचे खूप वाईट वाटते ... आता वॉकर नी घरातल्या घरात फिरतो म्हणाला !
निरलस प्रेम कसं करावं त्याच्याकडून शिकावं . आणि त्याला साथ मिळाली स्वातीमामीची ! अगदी त्यांचा तर तो "बबड्या 'च लाडाचा नवरा ! जे पाहिजे ते, जसं पाहिजे तसं ! दोघांची केमिस्ट्री का काय म्हणतात ती इतकी जुळलेली आहे . ...अगदी आयुष्यभर ज्या विडी न त्याचा घात केला , घरातील सगळ्यांचा तिरस्काराचा विषय .... आता तब्यत *अशी* असतांना सुद्धा मामी त्याचे विडीचे सुद्धा लाड पुरवतात !! *लाडाचो नवरो ..*
स्वातीमामीच सुद्धा आयुष्य कष्टात गेले , जात आहे , आणि प्रचंड त्रासात ही वास्तविकता ! मात्र तशातही तुरु तुरु कार्यरत होतात स्वागत , आव भगत करतातच अन तेही हसत हसत ! आजच्या मुला मुलींना हे घेण्यासारखे आहे ....
या वाढदिवसाच्या निमित्ताने मामाचं अन त्याच्यामुळे मामीचं लॉकडाऊन बालाजीराया खतम कर हिच प्रार्थना करतो आणखी काय ?
अगस्ती