तिर्थरूप भाऊंना
||श्री|| Eindhoven
20/7/92
तिर्थरूप भाऊंना
शिर साष्टांग नमस्कार. आता रात्रीचे अकरा वाजलेत. जग्गु, संजय (अग्रवाल ) दोघेही त्यांच्या घरी गेलेत आज मस्त पावभाजी भात असा बेत होता .भाजी जरा पांचट झाल्याकारणाने खुप उरली आहे . शामदादाकडे जे काही थोडेफार शिकलो त्याचा खूपच उपयोग होतो आहे .फोडणीचा भात त्याला इथे पुलाव पुलाव करत ताव मारतो कधी कधी वरण पण करतो .येथे तांदूळ अगदी नाही तरी बरया पैकी स्वस्त मिळतात . आल्यावर सुरुवातीला नेहमी कोणतीही किम्मत पाहिली कि त्याला 17 ने गुणायचो .आता तसे करत नाही .मला तसा तांदुळाचा भाव माहिती नाही परन्तु असे प्रत्येक गोष्टीचे भाव पहात बसत नाही . या सर्व गोष्टी येथे अल्बर्टाइन नावाच्या सुपर मार्केट मधुन घेतो . येथे दुकाने सकाळी 9 वाजता उघडतात ते संध्याकाळी 5 पर्यन्त .त्यामुळे पंचाईत . कार्यालयीन वेळा सकाळी 9 ते 5 शुक्रावारी संध्याकाळी 8 वाजे पर्यन्त असतात . त्यामुळे तेव्हा सर्व आठवड्याभराची खरेदी करून ठेवतो . तसे शनिवारी दुकाने उघड़ी असतात पण आमचा शनिवार रविवार असा कुठे तरी जाण्याचा बेत असतो . एका आठवड्याचा खर्च दोघे मिळुन जवळपास 80 गिल्डर्स येतो त्यात आम्ही जवळपास 20 बनपाव , 100 स्लाइस ब्रेड , 1×10 बियर क्रेट, 3×2 लीटर कोका कोला पेप्सी सेवन अप 4-5 लीटर फ्रूट जूस , 250 gm लोणी, 2×10 स्लाइसेस चीज (हॉलैण्ड चे चीज बरयापैकी प्रसिद्ध आहे .येथे गौड़ा,इदाम वगैरे चीज पूर्ण यूरोप अमेरिका येथे जाते ).२.५ किलो बटाटे, 2किलो कांदे , 1 टोमॅटो सॉसची बाटली ,1 किलो सफरचंद 1 डझन केळ ,10 कैडबरी चॉकलेट , बरेचसे icecream व केळी दही किवा स्ट्रॉ बेरी दही असे मिश्रण असलेले योगर्ट कॉफी पाउडर ,दूध ,दूध पाउडर , (त्याला इथे milkcream म्हणतात )'1किवा 2 वाइन बॉटल्स , वगैरे वगैरे सगळे येते .त्यामुळे किमती कधी पाहण्या ची कधी वेळ येत नाही . मी आता जे लिहिले ते या शुक्रावारी जी खरेदी केली त्याची पावती जवळ ठेवून करतो आहे 78.50गिल्डर्स एवढा खर्च आला . continues...
(2)
*तीर्थरूप भाऊंना.......*
व हे सगळे विकत घ्यायला मला त्याचे संपुर्ण स्पष्टीकरण लिहायला लागला त्यापेक्षा कमी वेळ लागला . दुकानात जायचे 1- गिल्डरचे नाणे ढकल गाडीला असणाऱ्या खाचेत ढकलायचे म्हणजे गाडीला असलेले लॉक उघडते. ती धकाळगाडी घेऊन त्यात जे लागेल ते टाकत सुटायचे. नंतर दुकानाच्या बाहेर निघताना सगळ्या गोष्टी दुकानाच्या काउंटरवर मांडायच्या. त्याची पावती घ्यायची . तेथेच 35सेन्ट प्रमाणे 3-4 प्लॅस्टिकच्या पिशव्या विकत घ्यायची झाल आम्ही या गोष्टी पुर्ण आठवडाभरासाठी साठवून ठेवतो.
आता थोडे माझ्या घराबद्द्ल घराचे फोटो थोड्या दिवसात पाठवेन आम्ही शनिवारी रविवारी अमस्टरडॅम गेलो होतो. तेथे तो रोल विसरून आलो नाहीतर आताच पाठवले असते.
पूर्ण घरात गालीचा आहे. प्रत्येक खोलीत हिटर असते , A/C नाही. सध्या इकडे उन्हाळा आहे त्यामुळे तापमान कमाल 30 सें. तर किमान 15℃ पर्यंत जाते त्यामुळे स्वेटरची पण गरज नाही. प्रत्येक बेसिन च्या ठिकाणी गरम-थंड पाण्याचे नळ, मस्त शॉवर, स्वयंपाक खोलीत फ्रिज , ओव्हन , गॅस( येथे घरबांधताना आपल्या येथे जसे वीज / पाणी याचे कनेक्शन मिळते तसे येथ वीज/गॅस/पाणी/टेलिफोन यांचे कनेक्शन मिळते), Egg boiler (अंडे उकळण्यासाठी अंडे टाका, 1 ग्लास पाणी, स्विच ऑन, खल्लास ) , Toaster (ब्रेड आता टाका, स्विच ऑन), कॉफी पॉट (पाणी, कॉफी पावडर ...जाऊद्या आकृतीच काढतो)(आकृती बाजूला काढलेली), अजून बरेच काही आहे. भांड्यांमध्ये कुकर , बरेचसे निर्लेपचे भांडे-तवा(frying pan), 40 वेगवेगळ्या प्रकारच्या डिशेस, ढेर सारे पेले ( बिअर साठी मग्स , वाईन साठी🍷,शमपैनसाठी 🥂 , इत्यादी) , घर साफ करण्यासाठी दर आठवड्याला एकदा मंगळवारी गोरी बाई येते . भुरभुर मशीन घुमावते व 37 गिल्डर घेऊन जाते (कंपनी हे पैसे देते) तसे व्हॅक्युम क्लिनर यथे आहे . पण इकडे कचराच होत नाही इव्हन माझ्याकडून पण ! रात्रीचे बारा वाजलेत. थोडयावेळा पूर्वी AIR(ALL INDIA RADIO ) ची ' रातकी सभा' , ' खतम' झा. येथे घरात टेलिफोन (00-31/-40-550771) , TV ,
. Continues....
(3)
दोन two-in-one , एक ऍम्प्लिफएर इत्यादी ऑडीओ सिस्टिम पण आहेत. टिव्ही वर जवळपास 25-26 चॅनेल्स आहेत. मी सगळे मराठीत लिहिण्याचा विचार केला पण चॅनेल्स, ऍम्प्लिफएर ला मराठी प्रतिशब्द नाहीत. असो. 25 चॅनेल्स पैकी 4 BBC चे आहेत, 1 CNN, 1 MTL व बाकी सगळे डच जर्मन बेल्जियम आहेत. डच/बेल्जियम चॅनेल्स वर पण बहुतेक इंग्रजी कार्यक्रम असतात. ते त्याला डच टायटल्स देतात. बेल्जियम मध्ये दोन प्रमुख भाषा आहेत. उत्तर बेल्जियम मध्ये डच बोलतात तर दक्षिण भागात फ्रेंच. बाजूला नकाशा मुळीच अचूक नाही (बाजूला नकाशा काढलेला) परंतु एकंदर कल्पना येऊ शकते . मी येथे 22 जून ला आलो, 29 जून ला आम्ही लॅक्सएम्बेर्ग येथे गेलो त्याकरिता बेल्जियम देश पूर्ण पार केला - कारने आइंदहोवन पासून 4 तासात! कारची सरासरी गती 100-120 की मी होती. आमचा चालक म्हणजे उदय घारपुरे. सकाळी निघालो रात्री घरी वापस. लॅक्सएम्बेर्ग अतिशय सुंदर देश/शहर आहे भाषा फ्रेंच संपूर्ण हिरवेगार ( पूर्ण युरोप हिरवागार आहे) पहाडी सुंदर, रस्ते, रंगबिरंगी कपडे घातलेले लोक कपड्यांची ऍलर्जी असणारे लोक ( प्रामुख्याने स्त्रिया) , अत्यंत जुन्या इमारती , बऱ्यापैकी ऐतिहासिक पार्श्वभूमी. खरे सांगू मला या सगळ्या गोष्टी इथे येऊन मिळमिळीत वाटायला लागल्या आहेत. कारण इव्हन EINDHOVEN अत्यंत सुंदर , हिरवेगार, मॉडर्न शहर आहे. सगळा युरोप खंडच तसा आहे. सगळे सुंदर असले की मजा येत नाही
आता झोपले पाहिजे! सकाळी सात वाजता उठून आंघोळ वगरे आटोपून , न्याहारी करावी लागेल. व 8-31 ची सिटीबस पकडायची आहे. येथे सिटीबस सर्विस अत्यंत सुंदर आहे . अगदी घड्याळाच्या काट्यावर हुकूम चालतात. असो.
आता उद्या परत सुरू करतो.
Eindhovan
29/7/92
या आधीच्या पानावर मी लिहिले की मी उद्या सुरु करतो तर "उद्या' तब्बल 9 दिवसांनी उजाडला . कारण ?कारण मला ठाऊक नाही दररोज विचार करायचो की आज लिहू या पण .... आता परवा संजय अग्रवाल भारतात वापस येतोय तर सबळ कारण मिळाले .
तसे पत्र का लिहायचे याचा खुप विचार मी गेले सात आठ वर्षापासून करत आलोय .तुम्हाला काही माहिती कळविने हा एक उद्देश असु शकतो .म्हणजे बाकी सगळे पत्र त्या कारनाकरिता लिहितात . दुसरया वर्गातले लोक पत्र "एक ओपचारिक ' जबाबदारी म्हणुन लिहून टाकतात .तिसऱ्या वर्गातले लोक टाइमपास करण्याकरिता टाकतात . (अगस्तीला अशी एक व्याक्ति ठाऊक आहे ! ) माझ्यापुरते बोलायचे झाले तर मि यापैकी कोणत्याही गटात बसत नाही .मी पत्र लिहितो ते माझ्याकरिता . लातुरे,नांदेड, मुम्बई व आता इथे जेव्हा केव्हा एकदम सगळ्यांची आठवण येते ,किंवा जरासे एकलकोंडे वाटते कसं सांगाव ? म्हणजे कस , जरा काहीतरी आपण मुकतोय अशी जाणीव होते तेव्हा पत्र लिहिले की जरी ते पत्र पोस्टात गेले नाही तरी तुम्हा सर्वांशी संवाद साधल्या सारखे वाटते .असा अनुभव अजुन कुणास आलाय की नाही कुणास ठाऊक पण मी खुप खुप वेळा घेतालाय मला तर ति पत्रे आठवातात जी मी लिहिली खुप मोठी ,पण दोन तीन दिवसांनी जेव्हा मी स्वताच ते पत्र वाचायचो तर ते भावनेच्या भरात लिहिल्या गेलेले भिकार पत्र असायचे .मग काय ते तसेच पडून राहायचे ,फाडायचो नाही कारण ते इतकेहि भिकार असायचे नाही .असो मला पण भावना आहेत है वाचून बरयाच जणांना ह्र वि ध (हृदय विकाराचा धक्का ) बसण्याची शक्यता आहे तेव्हा जरा जपुन !! है पत्र किंवा है पान त्यांना वाचायला देताना statutory warning द्या .
सध्या बरयापैकी कामात व्यस्त आहे .मोजून आठ तास काम करतो .थोडे पण जास्त करत नाही ,का करू ?काही फायदे थोड़ी आहेत .तसे कामात सहभागी असणारे सर्व अगदी चांगल्या स्वभावाचे आहेत .माझ्या सहयोगी रिचर्ड बिश्कोप्स तर त्यातल्या त्यात . पाहू उरलेले दोन महीने कसे वागतात ते .
Continues...
सकाळी 7 वाजता उठतो ,8.31 ची बस , 8.35 ला ऑफिस मध्ये Automatic vending machine मध्ये 25 सेंट्स चे नाणे टाकले की एक कप कॉफ़ी (कडवट ,खूपच कमी साखर आणि थोडेसे दूध ),अजुन थोड्या वेळाने दूसरा कप , करता करता संध्याकाळ पर्यन्त 6-7 वेळा कॉफी पितो .दुपारी 12 वाजता लंच (?) त्यात मी 1 साधा बनपाव +1 काजू किसमिस वाला बनपाव +लोणी +1 केळ घेतो, खर्च 3 गिल्डर्स . काम खुप चांगले पण नाही आणि वाईट पण नाही 3 महिन्याकरिता चालेल . त्यानंतर के ते पाहू या .माझी स्वतःचीच इच्छा नाहीये .
वा वा चांगले गाणे लागलेय ,थांबा लिहितोच मी ..
क्यो जिन्दगीकी राह में मजबूर हो गये ।
इतने हुवे(ए?)करीब के
हम दुर हो गये ।।धृ।।
ऐसा नही के हम को
कोई भी खुशी नहीं।
लेकिन जिंदगी तो कोई
जिंदगी नही ।।
× × × ।। 1 ।।
पाया तुम्हे तो
हम को लगा के
तुमको खो दिया
हम दिल पे रोये और
दिल हम पे रो दिया
पलको के खाब क्यो
यू चूर हो गये ।। 2 ।।
गझल आहे मला चित्रपट आठवत नाही पण त्यात फारूक शेख व दीप्ती नवल दोघेही होते .तुम्हाला माहिती नसणार ,पण हिंदी गाणी पण चांगली असतात .जर तुम्ही असे भारता पासून दूर याल तर ऑल इंडिया रेडियो वर लागणारे शास्त्रीय संगित पण कान देवुन ऐकाल ,असो .
Continues ....

मी येथे फिलिप्सचा एक रेडिओ विकत घेतला दि 24/2/92 रोजी . त्याचे आकरमान 12×7×2.5 सेमी इतके छोटे आहे .त्याला 12 बैंड आहेत 9 शार्ट वेव्ह 1 लॉन्ग वेव्ह 1 मीडियम वेव्ह, 1 FM (frequency modulation) FM आपल्याकडे फक्त मुंबई येथेच आहे .किम्मत फक्त 139 गिल्डर्स .ऑगस्ट च्या दुसरया किवा तिसऱ्या आठवड्यात मी अजुन एक रेडियो विकत घेणार आहे . त्या रेडिओ ची खासियत अशी की त्यात फ्रीक्वेंसी key in करावी लागते म्हणजे आपण कैलक्यूलेटर मध्ये जसे आकड़े टाइप करतो तशी .जर मला AIR लावायचे असेल तर 7412/9950/11620 यापैकी कोणतीही फ्रीक्वेंसी टाकायची आणी वर बरयापैकी स्पष्ट ऐकू येते त्याला selectivity म्हणतात .दोन स्टेशन जवळ जवळ असले कि जर चांगली selectivity नसेल तर आपल्याला दोन्ही स्टेशनचे आवाज येतात . अरेरे मी अगदी टेक्निकल बाबी कड़े वळलो . आई बाबी अन हेरंब अगदी बोअर होतील.संजयरावाना बहुतेक बोअर होणार नाही . तुम्हा कुणाला रेडिओआवडतो की नाही ? मी TV ऐकत /पहात नाही सारखे टेच ते पाहुन कंटाळा आलाय .
कालच अमजद खान वारल्याचे कळले .असाच रात्री मी अभ्यास करत असतांना एकदम "अरे ओ सांबा ' अशी आरोळी ऐकू आली ,मग कान देवुन ऐकले तो अमजदखान वारल्याचे कळले .वाईट वाटले .
आज रात्री मी साधा भात + वरण (फोडनीचे )+ फुलकोबी बटाटे
मिक्स भाजी +पापड़ असा स्वयंपाक केला होता .चांगला स्वयंपाक कसा असतो याची कल्पना करीत करीत सगळ्यांनी सगळे संपविले .
आता मी थोडेसे जे करू नए पण करतो त्याबद्दल थोडेसे . .येथे जवळपास दर 4 -5 दिवसांनी आम्ही बियर पितो . मी आतापर्यंत 9-10 प्रकारच्या वाइन , 3प्रकारच्या रम ,2 प्रकारच्या विस्की , तर 9-10 प्रकारच्या बियर्स ची चव घेवून पाहिली आहे .वाईट ना !! पण मला एक कारण आहे येथे येवून सगळे पाहुन खाऊन पिवून जायचे आहे . म्हणजे है भाग कसा आहे याची कल्पना येते नाही ?
Continue....

(7)
खुप झाले ना ? सात सात पान वाचायची म्हणजे मोठा प्रश्नच नाही ?
त्यात आता माझा हात जास्त वळत नाही ,मी "ह ' आता अगदीच वेगळा काढतो ळ ,हृदय मधला " हृ ' तर मी जवळ पास विसरुनच गेलोय ." ल ' पण एकदम वेगळा येतो .ट व र बरयाच वेळा सारखे दिसतात ,"आणि ' कधी कधी "आणी ' बनतो .पण काय करणार थोड़ी लाज वाटते .पण दिवसभर आंग्लाळलेल्या भाषेत बोलायचे -लिहायचे तर थोडे नकळत का होईना पण आपण जो विचार करतो तो इंग्रजीत करावा लागतो अगदी " चांगला स्वभाव ' आठवण्या पूर्वी " पोलाईट' शब्द आठवतो .असे बरेच उदाहरणं (examples) आहेत .मला वाटते की मि माझी डायरी ( दैनंदिनी ) मराठीत लिहायला सुरु करतो असो .
काळजी करू नका. कारण तुम्ही सर्व माझी काळजी करीत आहात ही जाणीव मला मुळीच आवडत नाही ,23 वर्षाचा घोड़ा झालोय तरी तसेच वागतोय .आता मी बाकीच्यांची काळजी करायला पाहिजे नाही का ? पण कुत्र्याची शेपटी ...(आई म्हणेल लाज पण वाटत नाही मेल्याला )
मला एक पत्र जबलपुरला पण लिहायचेय .कारण दोन तीन वेळा औरंगाबादला फोन केला तर महाशय गायब . आरामात घे म्हणाव ,आम्ही काही त्याच्या मागे लागलेलो नाही आम्हाला (म्हणजे मला व हेरम्बाला ) बराच वेळ आहे शेवटची तारीख काही मला कळली नाही (की आठवत नाही )
दररोज मी नकुलचा फ़ोटो (छायाचित्र ) पाहतो , फंटास्टिक हि माझी पहिली प्रतिक्रिया, सुपर्ब ( दूसरी ), अति सुंदर (मराठी व तिसरी ) असो .मी माझे मॅ रा थों न पत्र येथेच थांबवतो .
ती सौ आईस , ति स्व अक्का, सौ बाबी,संजयराव,अगस्ती ,दादामामा-मामी,नानामामा-मामी, अजुन मोठे कोण कोण आहेत, ओहो मिनल?मिनाक्षी?मिनु वाहिनीं (मिनु वाहिनीं लिहिताना चुकुन मिनुमामीच लिहिणार होतो नकुल मुळे )
मी एक पत्र लवकरच अकोल्याला लिहिणार आहे तेव्हा सर्व काका लोकांना नमस्कार करेन, भारतातून नाही तर हॉलैंड मधुन !!!
-देवेन्द्र