ह्रुदयाचे तारुणपण
ओसरले नाही पण
झंकारत झुरण्याचे
वय निघून गेले ।
असेच काहीसे भाव ति.स्व. दिलीपराव कुलकर्णी यांचे आज असतील ...
त्यांच्या मुलांनी आज एकसष्टिचे सर्प्राइझ द्यायचे ठरवले ! बाबा आता तुम्ही रिटायर्ड झालात ,साठी ओलांडलीत,आता " दिल दोस्ती दुनियादारी' बंद ...हे सांगण्यासाठीच तर ..
तर अमेया बाबान्चे तारुणपण कधीच ओसरणार नाही ! प्रेमळ,जीव लावणारा स्वभाव कधी आटणार नाही, त्यांचे " दोस्त ' अन "सामाजिक जाणिवा' कमी होणार नाहित !
शुण्यातुन निर्मिती मी पाहिली, खामगावातिल फरशी तील घर मी पाहिले , स्व अण्णा बाईंच्या बाबतीत शेवट पर्यन्त त्यांनी केलेली कर्तव्यपूर्ती मी अनुभवलेली ! या सर्व कटकटी कमी की काय आम्हा शास्त्रींचे ते जावई झाले अन मोठ्या जावयाचे कर्तव्य त्यांच्या नशिबी आले ! प्रसंगी सिंघम होत त्यांनी ते यथोचित नुसते निभवलेच नाही तर बहरवले सुद्धा !!
राखी भाउबिजेला कुलकर्णी कमी शास्त्रीच जास्त !! आधीच्या पिढीला जसे "कुमुद'चे तसे आमच्यासाठी आक्कीचे स्थान निर्माण व्हायला त्यांच्या यजमानांच कर्तुत्व महत्वाच !!
स्व तात्यांची त्यांनी केलेली सेवा मी विसरु शकत नाही . आम्ही दुरून फक्त काळजी करू शकत होतो पण रात्री बे रात्री दत्ताला दिलीपरावच मदतीला . आर्थिक, शारीरिक ,मानसिक आधार त्यांचाच !!
सगळ्यात महत्वाचे त्यांनी जपलेला हरफनमौला स्वभाव ,ते जसे भजन किर्तनात रंगतात ( सासुबाई साठी) तसे आमच्या "रमी' ची त्यांना कटकट नसते , राणी दत्तालिनाला " सुगम ' मध्ये साथ देतांना आम्हाला आमच्या पार्ट्यांवर काकुबाई-प्रवचनं देत नाहीत! एन्जॉय म्हणत आशीर्वाद देतात !!😜 तात्यांशी त्यांचे नाते "गायछाप' मित्राचे होते तसे मैफिलिला
"अनुरागाने....' म्हणतान्ना ते तितकेच दिवाने होतात .
येथे कुणीच नाही
माझ्यापरी दिवाणे
मी गीत गात आहे
येथे गुन्ह्याप्रमाने ।
म्हणत तल्लीन होतात !! दिलीपराव तुम्ही आहात तसेच राहा आयुष्यभर निर्भिड, निसंकोच, आयुष्य जगा !! तुमच्या निरामय आयुष्य़ासाठी आम्ही आहोत इश्वर चरणी प्रार्थना करायला !!!
अमेयाने अचानक ठेवलेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहाणे जमले नाही ,सौ मिनल येण्यासाठी तयारीत होती तो दुकानातील फार्मासिस्ट आजारी पडला , तीला रद्द करावे लागले . दुपारपर्यंत व्यवस्था झाल्यास निघेन कदाचित. पण शक्यता दिसत नाही . दूकान मालक ही अपरिहार्य पण अवघड संकल्पना आहे .तरी आम्ही दिलीपरावांचे गुन्हेगार आहोत . क्षमा त्यांनी करू नए सजा सुनावावी आम्ही दोघे गोड करून घेवु --- सौ मीनल - अगस्ती
दिलीप मामा नमस्कार आणि शुभेच्छा !! - शुभांगी 28जुलै 2016